Infectious Diseases : वातावरण बदलांनी वाढल्‍या आरोग्‍याच्‍या तक्रारी; तापमानात वाढ!

तब्‍येतीची काळजी घेण्याचा तज्‍ज्ञांचा सल्‍ला
Infectious Disease
Infectious Diseaseesakal
Updated on

नाशिक : पाऱ्यातील चढउतार सातत्‍याने सुरू असून, मिश्र स्वरूपाचे वातावरण सध्या अनुभवायला मिळते आहे. अशा वातावरणात संसर्गजन्‍य आजार बळावण्याचे प्रमाण वाढत असल्‍याने आरोग्‍यविषयक तक्रारींमध्ये वाढ झाल्‍याचे समोर येत आहे.

सध्याच्‍या वातावरणाचा अंदाज घेता तब्‍येतीची विशेष काळजी घेण्याचा सल्‍ला तज्‍ज्ञांकडून दिला जातो आहे. (Infectious Diseases Health complaints exacerbated by climate change Rise in temperature nashik news)

काही दिवसांपूर्वी वातावरणात कमालीचा गारवा जाणवत होता. परंतु गेल्‍या दोन- तीन दिवसांपासून गारवा घटला आहे. दिवसाच्‍या वेळी कडक ऊन जाणवत आहे. पावसाची शक्‍यता वर्तविली असल्‍याने दिवसातील काही काळ ढगाळ वातावरण राहाते आहे. यामुळे संसर्ग आजारांचा प्रादुर्भाव होण्याचा धोका वाढलेला आहे.

सर्दी, खोकल्‍यासह ताप, अंगदुखी, घसादुखीच्‍या तक्रारींमध्ये वाढ झाली असल्‍याचे डॉक्‍टरांचे म्‍हणणे आहे. अशा वातावरणात आरोग्‍याची विशेष काळजी घेण्याचा सल्‍ला दिला जातो आहे. विशेषतः श्‍वसनाचे विकार असलेल्‍या व्‍यक्‍तींनी खबरदारीच्‍या उपाययोजना करत निरोगी राहण्याचा सल्‍ला दिला जातो आहे.

पारा वाढलेला

बदलत्‍या वातावरणामुळे पारा वाढलेला आहे. अशात मंगळवारी सकाळच्‍या वेळी शहरातील बहुतांश भागात धुके दाटून आलेले होते. तर या दिवशी नाशिकचे किमान तापमान १४.५ अंश तर कमाल तापमान २९.८ अंश नोंदविले गेले आहे.

हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस

Infectious Disease
Health Tips : बिअर प्यायल्याने कोलेस्ट्रॉल कमी होतंय? काय सांगतो अहवाल...

अशी घ्या आरोग्‍याची काळजी..

* गरम व ताजे अन्न सेवन करावे.

* आहारात पालेभाज्‍या, फळांचा समावेश असावा.

* शिळे, तळलेले पदार्थ खाणे सक्‍तीने टाळावे.

* उकळून किंवा स्‍वच्‍छ पाणी प्‍यावे.

* नियमित व्‍यायामावर भर द्यावा.

* योगासनांतून श्‍वसनाचे व्‍यायाम करावे.

* पुरेशी झोप घेत मानसिक स्‍वास्‍थ सुदृढ ठेवावे.

* आरोग्‍यविषयक तक्रार जाणवल्‍यास डॉक्‍टरांचा सल्‍ला घ्यावा.

* आजारपणात घरगुती उपाय करणे टाळावे.

* डेंगीची साथ सुरू असल्‍याने घर व परिसरात स्‍वच्‍छता ठेवावी.

Infectious Disease
Child Health : मुलांना आईवडिलांकडून जन्मत:च मिळतात हे आजार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.