मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव; कीटकनाशक फवारणासाठी खर्चात वाढ

Armyworm seen on maize crop in Shiwarat, Khuntewadi.
Armyworm seen on maize crop in Shiwarat, Khuntewadi.esakal
Updated on

देवळा (जि. नाशिक) : कसमादेतील काही भागात यावर्षीही मका पिकावर (Maize Crop) लष्करी अळीचा (Army Worm) प्रादुर्भाव दिसू लागल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे.

खते, बियाणे, मजुरीची रक्कम देण्याआधीच कीटकनाशकांची (Fertilizers) खरेदी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. (Infestation of armyworm on maize crop Cost increase for pesticide spraying nashik Latest Marathi News)

ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची सोय आहे असे काही शेतकरी अर्ली मका पीक घेतात. तसेच, काहींनी लवकर पाऊस पडला म्हणून लगेच मका पेरणी केली आहे. पुढील पीक घेण्याच्या दृष्टीने हे नियोजन असते.

अशी पिके शेतात डोलू लागली असतानाच पानांवर आणि पोग्यात लष्करी अळी दिसू लागल्याने शेतकऱ्यांच्या पोटात भीतीचा गोळा उठला आहे. मागीलवर्षी असेच आक्रमण झाल्याने मका पिकाचे नुकसान झाले होते.

Armyworm seen on maize crop in Shiwarat, Khuntewadi.
Nashik : पावसाच्या विश्रांतीनंतर विकेंड पर्यटनाला गर्दी

जोरात पाऊस पडल्यावर या अळीचा नायनाट होत असतो. परंतु, येथील भागात तसा जोराचा पाऊस न पडल्याने शेतकऱ्यांना महागडी औषधे फवारणी करण्याची वेळ आली आहे.

या अळीचे प्रमाण सध्या थोडे कमी असले तरी त्याचा प्रसार वेगाने होत असल्याने शेतकऱ्यांनी उपाययोजना करण्यास सुरवात केली आहे. देवळा तालुक्याच्या पूर्व भागात या अळीचा प्रादुर्भाव दिसू लागला आहे.

"अद्याप मका बियाणे आणि खतांचे पैसेही दिले नाहीत तेवढ्यात मका पिकावर लष्करी अळी दिसू लागल्याने शेती कशी करावी हा प्रश्‍नच आहे." - किरण भामरे, शेतकरी, खुंटेवाडी

Armyworm seen on maize crop in Shiwarat, Khuntewadi.
रावळगाव शिवारातील पांधन रस्त्यांची दुरावस्था

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()