Inflation News: हरभरा, साखरेच्या दरात वाढ! पुरणपोळीसाठी हलका करावा लागणार खिसा

Puran Poli
Puran Poliesakal
Updated on

Inflation News : पोळा आणि पुरणपोळी यांचे अतूट नाते आहे. बैलांना पुरणपोळीचा नैवेद्य देण्याची परंपरा आहे. त्यामुळे पोळ्याला पुरणपोळीची विशेष मागणी असते. मात्र, पुरणपोळीसाठी लागणाऱ्या हरभराडाळ आणि साखरेच्या दरात विक्रमी वाढ झाली आहे.

त्यामुळे यंदा पुरणपोळी महाग झाली आहे. यंदा पोळ्यावर महागाईचे ढग दाटले आहेत. (Inflation News Gram sugar price increase more spending for puranpoli ocassion bail pola festival 2023 nashik)

सणासुदीच्या तोंडावर मागणी वाढल्याने हरभरा डाळीच्या दरात वाढ झाली आहे. यंदा हरभरा डाळ प्रतिकिलो १५ ते २० रुपयांनी महागली आहे. १५ दिवसांपूर्वी ७० ते ७५ रुपये प्रतिकिलो असलेली हरभराडाळ आता ८२ ते ९० रुपये किलो झाली आहे.

त्यामुळे पुरणपोळी खवय्यांच्या आनंदावर विरजण पडणार आहे. साखरेच्या दरात तीन टक्क्यांनी वाढ झाली आहे. सप्टेंबरमध्ये साखरेचे दर ४८ रुपये किलोपर्यंत गेले आहेत. दीड महिन्यात साखरेच्या दरात चार रुपयांची वाढ झाली आहे.

सध्या साखर ३९ ते ४४ रुपये प्रतिकिलो आहे. ऑक्टोबर २०१७ नंतरचा हा सर्वोच्च दर आहे. याबाबत व्यापारी आणि उत्पादकांनी चिंता व्यक्त केली. कारण देशातील प्रमुख साखर उत्पादक राज्यांमध्ये महाराष्ट्र आणि कर्नाटकचा नंबर लागतो.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Puran Poli
Dhule Inflation News : महागाईचा श्रावण मास! धान्य, जिन्नसांच्या दराचा वाढता आलेख

या दोन्ही राज्यांत या वर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. त्याचा परिणाम ऊस उत्पादनावर होणार आहे. जूनमध्ये किरकोळ बाजारात साखरेचे दर ४२ रुपये किलो होते.

जुलै आणि ऑगस्टमध्ये ते ४४ रुपयांवर होते. सणासुदीच्या काळात साखरेच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता सौरभ बोथरा यांनी व्यक्त केली.

"नवीन हरभऱ्याची आवक होण्यासाठी अजून नऊ महिन्यांचा कालावधी आहे. पोळ्यानिमित्त हरभरा डाळीची मागणी वाढल्याने भाव वधारले आहेत. घाऊक बाजारात हरभरा डाळीच्या दरात क्विंटलमागे ६०० ते ८०० रुपयांची वाढ झाली आहे. भारत डाळ या ब्रॅन्डची सुरवात म्हणजे सरकारकडे असलेल्या साठ्यातील हरभऱ्याचे डाळीत रूपांतर करून ग्राहकांना स्वस्त डाळ देण्यासाठी केंद्राने पाऊल उचलले आहे. मात्र, ती डाळ मिळाली नसल्याने वाढलेल्या किमतीत हरभराडाळ खरेदी करावी लागत आहे." -संजय गणोरे, किराणा विक्रेता, पिंपळगाव बसवंत

Puran Poli
Retail inflation: महागाईपासून किंचित दिलासा! किरकोळ महागाईच्या दरात नोंदवली गेली घट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.