Nashik News: मुख्यमंत्री सचिवालयाकडे तक्रारींचा ओघ झाला कमी; 84 टक्के प्रकरणे निकाली

mantralaya
mantralayaEsakal
Updated on

नाशिक : शहरासह ग्रामीण भागातील सर्वसामान्य व्यक्तींना थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत आपल्या तक्रारी पोहोचविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात वर्षभरापूर्वी सुरू करण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री सचिवालय’ कक्षाविषयी फारशी जनजागृती न झाल्याने आणि तक्रारींवर कार्यवाही होत नसल्याने तक्रारींचा ओघ आता कमी होत चालला आहे.

प्राप्त तक्रारींपैकी ८४ टक्के तक्रारी या विभागाने निकाली काढल्या आहेत. (inflow of complaints to Chief Minister Secretariat reduced 84 percent cases settled Nashik News)

गेल्या २८ डिसेंबर २०२२ ला कक्ष सुरू कऱण्यात आला होता. पहिल्याच दिवशी दोन तक्रारीही प्राप्त झाल्या. त्यानंतर हळूहळू तक्रारींचा ओघ सुरुच राहिल्याने या कक्षाचे कामकाज विस्तारत गेले. आलेली तक्रार संबंधित विभागाकडे पाठवली जाते.

तक्रारदाराचे काम किंवा त्याचे निरसन होईपर्यंत संबंधित विभाग त्याकडे लक्ष देते. जिल्ह्यात सर्वाधिक तक्रारी या जिल्हा परिषदेविषयी प्राप्त झाल्या आहेत. त्यापाठोपाठ महापालिका, जिल्हा उपनिबंधक कार्यालय, शिक्षण विभाग, कृषी आदी विभागांविषयी प्राप्त झालेल्या तक्रारी त्या विभागाकडे पाठवण्यात आल्या आहेत.

mantralaya
Nashik ZP News: शिक्षणाधिकारींचा (मा) पदभार तूर्तास उदय देवरेंकडेच राहणार

तक्रारींवर थेट कारवाई होत नसल्याने त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येते. परिणामी, वर्षभरातच तक्रारींचा ओघ कमी होत चालला आहे. कृषी, एमएसईबी, विक्रीकर, अन्न व औषध प्रशासन, जलसंपदा या विभागांतील प्रत्येकी एक तक्रार दाखल झाली आहे.

विभागनिहाय प्राप्त तक्रारी

जिल्हा परिषद-१८

नाशिक महापालिका-१६

पोलिस आयुक्त-१३

भूमी अभिलेख-३

शिक्षण उपसंचालक-३

जिल्हा उपनिबंधक-२

mantralaya
Nashik News: स्वस्ताईमुळे चिकन टिक्क्याची खवय्यांना भुरळ; विक्रीत दुप्पटीने वाढ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.