नाशिक शहरातील अनधिकृत होर्डिंगच लपवाछपवी

nashik municipal Corporation.jpg
nashik municipal Corporation.jpgSakal
Updated on

नाशिक : शहराच्या विद्रूपीकरणाला आळा घालण्यासाठी, तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने पोलिसांनी ठोस भूमिका घेतल्यानंतर अनधिकृत होर्डिंग माध्यमातून खासगी वसुली बंद झालेल्या महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून माहिती दडविली जात आहे. पोलिस आयुक्तांनी अनधिकृत होर्डिंगची यादी मागितल्यानंतर याबाबत माहितीच नसल्याची भूमिका अतिक्रमण विभागाने घेतल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. महापालिका आयुक्तांनी सदरची बाब गांभिर्याने घेत तत्काळ माहिती सादर करण्याच्या सूचना दिल्या.

महापालिकेकडून अधिकृत होर्डिंगच्या जागा निश्‍चित केल्या आहेत. त्याव्यतिरिक्त अन्य ठिकाणी होर्डिंग्ज उभारल्यास ते अनधिकृत ठरतात. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाची मुख्यत्वे अनधिकृत होर्डिंग्ज हटविण्याची जबाबदारी असते, परंतु या माध्यमातून खासगी वसुली केली जात असल्याचे प्रकार समोर आले आहेत. नगरसेवकांकडून अनेकदा अनधिकृत होर्डिंग्ज बाबत आवाज उठविला जातो, परंतु कालांतराने तो आवाजदेखील खाली बसतो. आता पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी होर्डिंग्ज कोसळण्याबरोबरच त्यावरील मजकुरावरून कायदा व सुव्यवस्था बिघडत असल्याने होर्डिंग्जवर कारवाई सुरू केली आहे. निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर गल्ली बोळात इच्छुकांचे होर्डिंग्ज लागत असल्याने त्यातून विद्रूपीकरण वाढत आहे. परंतु, पोलिसांच्या कारवाईनंतर अशा प्रकारच्या विद्रूपीकरणाला ब्रेक लागला आहे. अनधिकृत होर्डिंगवरील कारवाईची व्यापकता वाढविताना पोलिस आयुक्त कार्यालयाने महापालिकेकडे अनधिकृत होर्डिंग्जची यादी मागविली, परंतु अतिक्रमण विभागाकडून माहिती न देता दडविली जात असल्याचा प्रकार अधिकाऱ्यांच्या बैठकीत समोर आला. या प्रकाराचे गांभीर्य ओळखून आयुक्त जाधव यांनी तातडीने माहिती सादर करण्याच्या सूचना अतिक्रमण व विविध कर विभागाला दिल्या.

nashik municipal Corporation.jpg
प्रवाशांना यंदाही आरक्षण करूनच करावा लागतोय रेल्वे प्रवास

विद्रूपीकरणाला चाप, होर्डिंग हटाव मोहीम जोरात

पोलिस आयुक्तालय व महापालिकेकडून कारवाई सुरू झाल्यानंतर आठ दिवसात ४१३ ठिकाणचे अनधिकृत होर्डिंग्ज उतरविण्यात आले. पंचवटी विभागात सर्वाधिक होर्डिंग्ज आढळले, नाशिक रोड ८८, सातपूर ७७, पश्चिम विभागात ७२, सिडको विभागात २६, पूर्व विभागात पाच अनधिकृत होर्डिंग्ज हटविण्यात आले.

अधिकृत जागा वाढविणार

महापालिकेच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी शहरात होर्डिंगच्या जागा वाढविल्या जाणार आहे. त्याचबरोबर अनधिकृत होर्डिंग उभारल्यानंतर अशांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी दिली.

nashik municipal Corporation.jpg
वनविभागाच्या जमिनीवरच होतेय गांजाची शेती; पोलिस अ‍ॅक्शन मोडवर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.