नाशिक : आयुष मंत्रालयाला (Ministry of Ayush) सुरगाणा तालुक्यातील (surgana patern) आदिवासी बांधवांवर केलेल्या कोरोनावरील आयुर्वेदिक उपचाराची माहिती पाठवण्यात येईल, अशी ग्वाही केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार (dr. bharati pawar) यांनी दिली. वैद्य विक्रांत जाधव (dr. vikrant jadhav) यांनी उपचार पद्धतीविषयीची प्रस्ताव डॉ. पवार यांना सादर केला. आदिवासी बांधवांसाठी मे- जूनमध्ये आयुर्वेदिक चिकित्सा आणि उपचाराचा उपक्रम राबवण्यात आला. आदिवासी बांधवांकडून त्यास प्रतिसाद मिळाला आणि वनस्पतिजन्य औषधे घेतल्याने त्यांचे आरोग्य पूर्वपदावर येण्यास मदत झाली. त्यादृष्टीने हा प्रकल्प उत्तम उदाहरण झाले आहे. मूळ सैद्धांतिक औषधांना आयुर्वेद भारतीय मूलशास्त्राची जोड देण्यात आल्याने आदिवासी बांधवांच्या प्रकृतीत सुधारणा झाली. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सुरगाणा तालुक्यातील आदिवासी बांधवांसाठी वैद्य जाधव यांनी मोफत आयुर्वेदिक उपचार पद्धती राबवली.
पुढाकार, उपचाराला मिळालेल्या यशाची माहिती पाठविणार
उपचारासाठी वापरण्यात आलेली औषधे, आदिवासी बांधवांकडून मिळालेला प्रतिसाद, जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या वैद्यकीय अधिकारी-आरोग्य कर्मचारी यांनी उपचारासाठी घेतलेला पुढाकार, उपचाराला मिळालेले यश अशी सारी माहिती वैद्य जाधव यांनी डॉ. पवार यांना सांगितली. तसेच कोरोना रुग्ण आणि पोस्ट कोविड यासंबंधीचे केस स्टडी डॉ. पवार यांना त्यांनी सादर केली. चर्चेवेळी डॉ. पवार यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावरील नोंदणीची माहिती जाणून घेतली.
‘सकाळ'ने दिले योगदान
कोरोनावरील उपचारात टप्पेनिहाय वापरलेली औषधे आणि त्यास प्रकृती सुधारणेतून रुग्णांकडून मिळालेला प्रतिसाद आणि त्यांचे अनुभव विस्तृत आकडेवारीसह डॉ. पवार यांना वैद्य जाधव यांनी सांगितली. तसेच आयुर्वेदातील सैद्धांतिक ग्रंथांमधील अवस्था अनुरूप केलेली औषध प्रकल्पात वापरली गेली. त्याचा वापर आयुर्वेदशास्त्र, लक्षणे, अवस्था नुसार अनेक वर्षांपासून यशस्वीपणे होत आहे. प्रकल्पासाठी शुद्ध आयुर्वेद औषधे वापरण्यात आली, त्याचा उपयोग भारत व विश्वाला व्हावा ही इच्छा वैद्य जाधव यांनी व्यक्त केली. त्याचप्रमाणे ‘सकाळ'तर्फे प्रकल्पासाठी देण्यात आलेल्या योगदानाची माहिती प्रस्तावाद्वारे डॉ. पवार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.
आदिवासी बांधवांसाठी नाशिक जिल्हा परिषदेने चांगला उपक्रम राबविला. तसेच आदिवासी बांधवांना मदत केल्याबद्दल डॉक्टरांना धन्यवाद दिले पाहिजेत.
- डॉ. भारती पवार, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.