Nashik Crime News : पंचवटीतील सिता गुंफा परिसरात चौघांमध्ये हाणामारी झाली होती. संशयित दोघांनी लाकडी दांडक्याने केलेल्या मारहाणीत एकजण गंभीररित्या जखमी झाला होता.
आडगाव वैद्यकीय महाविद्यालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यु झाला आहे. याप्रकरणी पंचवटी पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल झाला असून दोघांना अटक करण्यात आली आहे. (Injured person died in Panchvati clash murder nashik crime news)
मोहम्मद साहेब बाबू मोहम्मद मंसूर (वय २९, सध्या रा. मॉडेल कॉलनी, कॉलेज रोड. मूळ रा. परतैली, जि. कटिहार, बिहार) असे मृताचे नाव आहे. याबाबत मोहम्मद इंजमामुल मोहम्मद गुलजार हक यांनी फिर्याद दिली आहे.
त्यानुसार ते गेल्या मंगळवारी (ता. ६) दुपारी एकच्या सुमारास साहेब बाबू याच्यासह सिता गुंफा परिसरात आले होते.
त्यावेळी संशयित केशव शिंदे व त्याचा एक साथीदार त्याठिकाणी आले. त्यांनी साहेब बाबुला बोलावून घेत त्याच्याशी बोलत होते. बोलता-बोलता त्यांच्यात बाचाबाची होऊन त्याचे पर्यावसन मारहाणीत झाले. दोघा संशयितांनी लाकडी दांडक्याने साहेब बाबू याच्यासह इंजमामुल हक यांना बेदम मारहाण केली. यात साहेब बाबू यास गंभीर मार लागला होता.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
त्यामुळे त्यास आडगाव येथील डॉ. वंसतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना बुधवारी (ता. ७) त्याचा मृत्यु झाला. या प्रकरणी पंचवटी पोलिसांत केशव शिंदे व त्याच्या साथीदारांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाला असून, सहायक पोलीस निरीक्षक मिथून परदेशी तपास करीत आहेत.
अतिरक्तस्त्रावामुळे मृत्यु
या हाणामारीत साहेब बाबुला हाताच्या मनगटावर खोलवर जखम झाली होती. त्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्याचा मृत्यु झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
नाजूक कारण
या मारहाणीमागे नाजूक कारण असल्याचे समोर येते आहे. त्यावरून संशयित केशव शिंदे याने मयत साहेब बाबू यास जाब विचारला असता, साहेब बाबू जुमानत नव्हता. त्यामुळे केशव व त्याच्या साथीदाराने साहेब बाबूस बेदम मारहाण केली असता, यातच त्याचा मृत्यु झाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.