नाशिकच्या साहित्य संमेलनात धक्कादायक प्रकार घडला आहे. नाशिकमध्ये आज संमेलनाचा शेवटचा दिवस होता. कार्यक्रमाची सांगता होत असताना वरिष्ठ पत्रकार आणि लेखक गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली. संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी हे कृत्य केल्याचं समोर आलंय. यावर संभाजी ब्रिगेडने स्पष्टीकरणही दिलंय. संभाजी राजांचा अपमान करणारं पुस्तर लिहिल्याचा आरोप गिरीश कुबेर यांच्यावर करण्यात आला. त्यातूनच शाईफेक केल्याचं संभाजी ब्रिगेडने सांगितलं.
गिरीश कुबेर यांनी Renaissance State: The Unwritten Story of the Making of Maharashtra हे पुस्तक लहिलं आहे. यामध्ये संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह माहिती प्रसिद्ध केल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने केला आहे. याचा निषेध करण्यासाठी संभाजी ब्रिगेडने कुबेर यांच्यावर शाईफेक केली. मात्र यानंतर संभाजी ब्रिगेडच्या प्रतिनीधींना यासंदर्भात महिती विचारल्यानंतर पुस्तकात काय आहे, हे दूरच, पण पुस्तकाचं नावंही सांगता आलं नाही. त्यामुळे संभाजी ब्रिगेडने कोणत्या आधारे हे कृत्य केलं, या स्पष्टीकरण पाहाणं महत्वाचं आहे.
नितिन रोटे पाटील यांनी संभाजी ब्रिगेडकडून झालेल्या शाई फेकीबाबत प्रतिक्रिया दिली. 'संभाजी महाराजांवर गिरीश कुबेर यांनी पुस्तक लिहिलं, त्यात संभाजी महाराजांनी आईची हत्या केली,महादजी शिंदेंची बदनामी केली. त्याचा वचपा काढण्यासाठी संभाजी ब्रिगेड आम्ही त्यांच्यावर लक्षच ठेवून होतो, असं त्यांनी 'एबीपी माझा'ला सांगितलं
आज पट्ट्यात येतील, उद्या पट्ट्यात येतील, ते भेटलेच संभाजी ब्रिगेडच्या वाघांना! शेवटी वचपा काढलाच असंही ते म्हणाले. दरम्यान, नितिन रोटे पाटील यांना एबीपी माझाच्या प्रतिनिधीने पुस्तकाचं नाव विचारल्यानंतर ते मात्र सांगता आलं नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.