नाशिक : कॉलेज रोड परिसरात रिक्षातून आणलेले पाण्याच्या बॉटलचे बॉक्स उतरवून घेण्यावरून दोघा सराईत गुन्हेगारांनी (Criminals) दोन व्यावसायिकांना मारहाण (Beating) केली. यात दोघे व्यावसायिक जखमी झाले आहेत. (Innocent goons beat up businessmen Nashik Crime Update news)
याबबात गजेंद्र माहौर (रा. सुभद्रा चेंबर्स, घारपुरे घाट, अशोकस्तंभ. मूळ रा. ग्वालियर, मध्यप्रदेश) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित राहुल राजेंद्र निरभवणे (वय १८), राहुल संजय तुरे (२०, रा. मखमलाबाद शिवार) या दोघा गुन्हेगारांविरोधात गंगापूर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. माहौर यांचे कॉलेज रोडवर छोटू कोल्हापूर हे वडापावचे दुकान आहे. शनिवारी (ता. ९) गजेंद्र व राहुल मुलचंद राजपूत दुकानावर होते.
त्यावेळी संशयित राहुल निरभवणे व राहुल तुरे रिक्षातून दुकानावर आले आणि रिक्षातून आणलेले पाण्याच्या बॉटलचे बॉक्स खाली उतरवून घेण्यावरून त्यांच्याशी वाद घातला. त्यावरून संशयित निरभवणे याने त्याच्याकडील कोयत्याने गजेंद्रच्या कपाळावर मारून दुखापत केली, तर राजपूत यालाही दोघांनी कोयत्याने मारून दुखापत केली. शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. याप्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक एन. व्ही. बैसाणे तपास करीत आहेत.
दरम्यान, संशयित राहुल निरभवणे व राहुल तुरे यांच्याविरोधात चोरी, घरफोडी यासारखे गुन्हे दाखल आहेत. निरभवणे याच्याविरोधात पंचवटी पोलिस ठाण्यात तीन व म्हसरुळ पोलिसात एक, असे चार घरफोडी व चोरीचे गुन्हे दाखल आहेत, तर राहुल तुरे याच्याविरोधात म्हसरूळ व पंचवटी पोलिसांत घरफोडी व अपघाताचा गुन्हा दाखल आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.