Nashik Crime : इनोव्हा कारची सिनेस्टाईल चोरी ‘CCTV’मध्ये कैद; 10 मिनिटांत चोरट्यांनी ठोकली धूम

crime news
crime news esakal
Updated on

जळगाव नेऊर (जि. नाशिक) : जिल्हा बँकेच्या जळगाव नेऊर शाखेत गेल्या मंगळवारी (ता. २८) मध्यरात्री पश्‍चिम बाजूच्या भिंतीला भगदाड पाडून बँकेत प्रवेश करून चोरीचा प्रयत्न फसल्याची घटना ताजी असतानाच, दुसऱ्याच दिवशी म्हणजे बुधवारी (ता. २९) मध्यरात्रीच्या वेळी जळगाव नेऊरच्या पैठणी हबमधील साई माऊली पैठणीसमोर लावलेली अंदाजे २० लाख रूपये किमतीची इनोव्हा कार चोरट्यांनी अवघ्या दहा मिनिटांत लंपास केली. (Innova car worth 20 lakh rupees looted by thieves from Jalgaon Neur nashik crime news)

मास्टरमाइंड चोरट्यांनी सिनेस्टाईलने कार सुरू करून अतिशय वेगाने नाशिकच्या दिशेने धूम ठोकल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झालेली दिसत आहे. जळगाव नेऊर येथे लागोपाठ झालेल्या चोरीच्या घटनांमुळे पंचक्रोशीतील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. साई माऊली पैठणीचे संचालक प्रकाश किसन शिंदे यांच्या मालकीची टोयोटा कंपनीची सफेद रंगाची इनोव्हा क्रिस्टा २.४ (एमएच १६, बीव्ही ७७५७) ही कार पैठणीसमोर नेहमीप्रमाणे लावलेली होती.

३० मार्चला मध्यरात्रीनंतर ०१:५९ ते ०२:०९ च्या सुमारास सफेद रंगाच्या अनोळखी ह्युंडाई कंपनीच्या क्रेटा कारमधून आलेल्या दोन चोरट्यांनी ड्रायव्हरबाजूच्या मागील दरवाजाची काच फोडून, मागील दरवाजा उघडून गाडीत प्रवेश केला. चोरट्यांनी दहा मिनिटांच्या आत गाडीच्या सॉफ्टवेअरमध्ये छेडछाड करून गाडी सुरू करत नाशिकच्या दिशेने धूम ठोकली. हा संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसत आहे.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

crime news
Nashik News : भटके जनावरे होताहेत गायब

तत्पूर्वी बुधवारी (ता. २९) श्री. शिंदे हे कामगारांसोबत रात्री साडेदहाला झोपी गेले. त्यांना गुरूवारी पहाटे तीनला श्रीराम नवमीनिमित्त शिर्डी येथे दर्शनासाठी जायचे होते. नेहमीच्या सवयीप्रमाणे पैठणी दालनाचे शटर उघडण्याअगोदर त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरा तपासला. त्यावेळी त्यांची इनोव्हा कार नेहमीच्या ठिकाणी नसल्याचे दिसून आले. गाडीची चावी मात्र ठेवलेल्या जागीच होती. त्यामुळे गाडी चोरी झाल्याचा संशय आला.

शटर उघडून बाहेर गाडी लावलेल्या ठिकाणी जाऊन पाहिले असता, त्या ठिकाणी तुटलेल्या काचा जमीनीवर पडलेल्या दिसल्या व गाडी चोरी झाल्याची खात्री झाली. प्रकाश शिंदे यांनी तातडीने दुरध्वनीद्वारे येवला तालुका पोलीस ठाण्यात गाडी चोरी झाल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद नोंदविली. पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार व त्यांचे सहकारी तपास करत आहेत. पोलिसांनी येसगाव जवळील टोलनाक्यावरील सीसीटीव्ही फुटेज चेक केले असता, गाडी तेथूनच गेल्याचे निष्पन्न झाल्याचे श्री. पवार यांनी सांगितले.

crime news
Nashik News : एप्रिल खरड छाटणीला वेग; शेतकऱ्यांकडून पुढील हंगामाची तयारी सुरु

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.