शेतकऱ्यांच्या लेकरांचं शेतकऱ्यांसाठी संशोधन; अत्याधुनिक फवारणी यंत्र

Stundents made innovation of Sophisticated sprayer
Stundents made innovation of Sophisticated sprayeresakal
Updated on

गणूर (जि. नाशिक) : शेतात विविध फळबागांवर औषध फवारणी (medicine spraying) करताना कीटकनाशकांशी (pesticides) आलेल्या थेट संपर्कामुळे अनेक शेतकऱ्यांच्या जिवावर बेतले आहे. फवारणी करतांना शेतकऱ्यांवर (Farmers) येणारे फवारे यासाठी कारणीभूत असल्याचे लक्षात येताच औषध फवाऱ्यांचा संपर्क टाळण्यासाठी अत्याधुनिक फवारणी यंत्र (Sophisticated sprayer) तरुणांनी विकसित केल्याने हे यंत्र सध्या चर्चेत आहे. (innovation of Sophisticated sprayer by SNJB engineering Students Nashik News)

चांदवड येथील एसएनजेबी संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या यांत्रिकी शाखेतील अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनी हे यंत्र विकसित केले असून, पारंपरिक औषध फवारणी यंत्रात असलेले दोष टाळत त्याची निर्मिती करण्यात आली आहे. सदर विद्यार्थी हे ग्रामीण भागातील असून, शेतकरी कुटुंबातील आहेत. शिक्षण घेत असताना शेतकऱ्यांसाठी नवीन काहीतरी करावे असे त्यांना मनापासून वाटत होते. त्यांनी मल्टिपर्पझ ॲग्रीकल्चर रोबोटची निर्मिती केली. हा रोबोट रिमोटवर चालतो. शेतात फवारणीसाठी शेतकरी बांधावर बसून हा रोबोट चालवू शकतो. त्यामुळे शेतकरी कीटकनाशकाच्या संपर्कात येत नाही. साहजिकच विषबाधा व कुठलीच शारिरीक व्याधी होत नाही. हा रोबोट इलेक्ट्रिक बॅटरीवर चालणार असून, चार्जिंगनंतर साधारणतः एक तास बागेत फवारणी करू शकतो.

यात फोर व्हीलर ड्राईव्ह या संकल्पनेचा वापर केला असून, रोबोट चिखलात फसण्याचा प्रकार घडणार नाही. तसेच, रोबोट चालवणे, पंप मीटर, गवत कापणे अशी कामे रिमोटवर होणार आहे. त्यामुळे शेतकरी शेताच्या एका बाजूला बसून रिमोटवर हा रोबोट चालवू शकतो. ट्रॅक्टरसाठीच्या इंधन खर्चाची बचत होणार असून, पिकांची नासाडी टाळता येणार आहे. वेळेची बचतही होणार आहे.

यशस्वीरीत्या विकसित केलेल्या यंत्राबद्दल संस्थेच्या विश्‍वस्त समितीचे अध्यक्ष बेबीलाल संचेती, उपाध्यक्ष दिनेशकुमार लोढा, सेक्रेटरी जवाहरलाल आबड, प्रबंध समितीचे अध्यक्ष अजितकुमार सुराणा, उपाध्यक्ष अरविंदकुमार भन्साळी, सहमानद सचिव झुंबरलाल भंडारी, सुनीलकुमार चोपडा, प्राचार्य डॉ. एम. डी. कोकाटे, उपप्राचार्य डॉ. एम. आर. संघवी, यांत्रिकी- अभियांत्रिकी विभागप्रमुख डॉ. एस. डी. संचेती आदींनी विद्यार्थ्यांचे कौतूक केले. सदर प्रोजेक्टसाठी नामदेव पवार, जगदीश गांगुर्डे, अमित कोतवाल, अमोल ठाकरे यांनी परिश्रम घेतले असून, प्रा. एस. पी. इंगळे यांनी मार्गदर्शन केले.

Stundents made innovation of Sophisticated sprayer
तिच तेरावं अन् निकालाचा दिवस एकच; मृत साक्षीला बारावीत 56 टक्के

"आमचे विद्यार्थी आपल्या अभियांत्रिकी कौशल्याचा वापर करून शेतकऱ्यांचे दैनंदिन प्रश्‍न सोडविण्यासाठी प्रयत्न करत आहे, याचा विशेष आनंद आहे. यामुळे शेतकऱ्यांचा कीटकनाशकांशी थेट संपर्क येऊन होणारी सर्व प्रकारची हानी टाळता येणार आहे."
- झुंबरलाल भंडारी, सह सचिव, एसएनजेबी, चांदवड

Stundents made innovation of Sophisticated sprayer
Nashik : भूसंपादनातील अडथळ्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.