नाशिक : अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने अग्निशमन विभागामार्फत खरेदी करण्यात आलेली हायड्रोलिक शिडी, तसेच यांत्रिकी झाडू खरेदी संदर्भात माहिती मागविली आहे. राज्य शासनाने मंजूर केलेल्या एकीकृत विकास नियंत्रण नियमावलीमध्ये नाशिक शहरात उंच इमारती बांधण्यास परवानगी देण्यात आली आहे. (Inquiring about purchase of mechanical sweeper with hydraulic ladder Report asked by government at winter assembly Nashik News)
हेही वाचा : ज्ञानेश्वरीत आहेत HR निगडित व्यवस्थापन सूत्रे...
त्याअनुषंगाने आग लागण्याची घटना घडल्यास तेवढ्या उंचीपर्यंत पोचण्याची व्यवस्था करण्यासाठी महापालिकेकडून ९० मीटर लांबीची हायड्रोलिक शिडी खरेदी करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी मागील वर्षी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. निविदा प्रक्रिया राबविताना अटी व शर्तीनुसार शिर्डी खरेदी करण्यात येत नसल्याची तक्रार महापालिका आयुक्तांकडे दाखल झाले. अटी व शर्तींमध्ये महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडून परस्पर बदल करण्यात आल्याचा मुख्य आरोप आहे.
हायड्रोलिक शिडीवर काम करताना कुशल मनुष्यबळ नसणे तसेच हायड्रोलिक शिडीचे स्पेअर पार्ट भारतात उपलब्ध नसल्याचा मुख्य मुद्दा अधोरेखित करण्यात आला. या अनुषंगाने राज्य शासनाकडेदेखील तक्रार करण्यात आली होती. राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने महापालिका आयुक्तांकडे हायड्रोलिक शिडी खरेदी संदर्भातील सर्व माहिती अहवालाच्या माध्यमातून सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
त्याचप्रमाणे महापालिकेकडून यांत्रिकी झाडूदेखील खरेदी केला जाणार आहे. त्या संदर्भातदेखील तक्रारी राज्य शासनापर्यंत पोचल्याने यांत्रिकी झाडू खरेदी संदर्भातील अहवाल महापालिकेकडे मागितला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.