महापालिकेकडून धोकादायक घरे खाली करण्याच्या सूचना

Inspection by Municipal Corporation East Divisional Officer Ner
Inspection by Municipal Corporation East Divisional Officer Neresakal
Updated on

जुने नाशिक : महापालिका पूर्व विभागीय अधिकारी नितीन नेर यांनी विभागातील धोकादायक वाडे आणि घरांची पाहणी केली. त्यात वास्तव्यास असलेल्या रहिवाशांना सुरक्षितस्थळी स्थलांतर होण्याच्या सूचना केल्या. दुर्घटना घडल्यास सर्वस्वी रहिवासी जबाबदार राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पावसाळ्यात धोकादायक वाडे आणि घरे कोसळण्याच्या घटना घडतात. पूर्व विभागात मोठ्या प्रमाणावर धोकादायक वाडे व घरे आहेत. अजून त्यात नागरिक वास्तव्यास आहेत. पावसाळ्यात धोकादायक वाडे व घरे कोसळून दुर्घटना होण्याची शक्यता आहे. असे प्रकार घडू नयेत, यासाठी काही दिवसांपूर्वी महापालिका आयुक्त रमेश पवार यांनी धोकादायक वाडे व घरांमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Inspection by Municipal Corporation East Divisional Officer Ner
8 दिवसात 1200 अतिक्रमणांवर बुलडोझर

त्यावरून पूर्व विभागीय अधिकारी नितीन नेर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता डी. पी. जाधव, जाहिरात व परवाने विभागाचे सहाय्यक अधीक्षक जुबेर सय्यद, घरपट्टी विभागाचे चंदू काटाळे, कुणाल जाधव, घरपट्टी विभागाचे दप्तरी नाईक, गिरीश शिंदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे रोड मुकादम नियाज शेख, गणेश कासार, दिलीप कळमकर आदींनी जुने नाशिक भागातील अतिधोकादायक घरे, वाड्यांना प्रत्यक्ष भेटी देऊन संबंधित घरमालक व भाडेकऱ्यांशी चर्चा केली. घरे खाली करण्याबाबतच्या सूचना केल्या. त्यांनी घरे खाली न केल्यास व कुठल्याही दुर्घटना घडल्यास त्यास सर्वस्वी रहिवासी जबाबदार राहणार असल्याचेही सांगण्यात आले.

भाडेकरू, घरमालकांत वाद

अधिक तर धोकादायक वाडे, घरांसंदर्भात भाडेकरू आणि घरमालक यांच्यात वाद सुरू असल्याचे समोर आले आहे. राहते घर, वाडा सोडल्यास मालक त्यावर कब्जा करून घेतील. आपणास काही मिळणार नाही, असा अनेकांचा समज आहे. त्यातून वर्षानुवर्षांपासून राहत असलेले भाडेकरू त्यांच्या ताब्यातील घरे व वाडे सोडण्यास तयार नाहीत. यामुळे धोकादायक वाडे आणि घरांचा प्रश्न निकाली निघत नाही.

Inspection by Municipal Corporation East Divisional Officer Ner
नाशिक शहरात 10 ठिकाणी स्मार्ट पार्किंग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()