Eknath Shinde Video: "आताही बॅगा घेऊन आलोय...", चक्क मुख्यमंत्री शिंदेंच्या बॅगांची तपासणी, संजय राऊतांच्या आरोपाला दिले उत्तर

Eknath Shinde: नाशिकमध्ये शिंदे हेलिकॉप्टरने उतरले त्यानंतर त्यांच्या बॅगांची तपासणी करण्यात आली आहे. याआधी शिवसेना ठाकरे गटाने नेते संजय राऊत यांनी शिंदेंवर बॅगेतून पैसे नेल्याचा आरोप केला होता.
Eknath Shinde
Eknath ShindeEsakal
Updated on

आज नाशिकमध्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बॅगांची तपासणी करण्यात आली आहे. नाशिकमध्ये ते हेलिकॉप्टरने ते उतरले त्यानंतर त्यांच्या बॅगांची तपासणी करण्यात आली आहे. याआधी शिवसेना ठाकरे गटाने नेते संजय राऊत यांनी शिंदेंवर बॅगेतून पैसे नेल्याचा आरोप केला होता.

गेल्यावेळी ते नाशिक दौऱ्यावर आले होते तेव्हा त्यांच्यासोबत दोन मोठ्या बॅगा होत्या, त्यावरून संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर लोकसभा निवडणुकीसाठी पैसे आणल्याचा आरोप करत हल्लाबोल केला होता. यावेळी नाशिकमध्ये आल्यानंतर शिंदेंच्या बॅगांची तपासणी करण्यात आली आहे.

Eknath Shinde
Loksabha Election: मुख्यमंत्री खाऊ घेऊन आले तो क्षण! शिंदेंच्या बॉडीगार्डसच्या हातात पैशांनी भरलेल्या बॅगा?; राऊतांच्या पोस्टमुळं खळबळ

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिकमध्ये हेमंत गोडसे यांच्या प्रचारासाठी दाखल झाले आहेत. महायुतीचे लोकसभेचे उमेदवार हेमंत गोडसे यांचा आज रोड शो असणार आहे. यासाठी ते आज नाशिकमध्ये दाखल झाले. हेलिकॉप्टरमधून उतरल्यानंतर त्यांच्या बॅगाची तपासणी करण्यात आली. तर माध्यमांनी बॅगांच्या संदर्भात प्रश्न केला असता मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, आजही बॅगा घेऊन आलोय.

Eknath Shinde
Manoj Jarange : मनोज जरांगे यांची 900 एकरांवरील सभा रद्द; काय आहे कारण?

आज विरोधकांनी केलेल्या आरोपावर एकनाथ शिंदे यांनी कृतीतून उत्तर दिल्याच्या चर्चा सध्या सुरू आहेत. गेल्या वेळी नाशिकमध्ये येताना काही तासांच्या दौऱ्यासाठी आले असताना इतक्या मोठ्या बॅगा सोबत ठेवण्यावरून संजय राऊत यांनी त्या बॅगांमधून पैसे आणल्याचा आरोप केला होता. त्यावरून राजकीय वातावरण तापल्याचंही दिसून आलं होतं

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.