जुने नाशिक : कठडा सुमन नाईक शाळा समोरील चार महिन्यापूर्वी काँक्रिटीकरणाचा तयार करण्यात आलेला रस्ता खचून ट्रकचा अपघात घडला. याबाबतचे वृत्त ‘सकाळ’ मध्ये प्रसिद्ध करण्यात आले होते. शनिवार (ता.१७) दुपारच्या सुमारास महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी घटनास्थळास भेट देत पाहणी केली. (Inspection of damaged road by NMC commissioner Dr chandrakant pulkundwar nashik Latest Marathi News)
या वेळी परिसरातील नागरिकांनी निकृष्ट कामास घेऊन नाराजी व्यक्त केली. आयुक्तांनी याबाबतची गंभीर दखल घेत घटनेची चौकशी करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच त्वरित खचलेल्या रस्त्याचे योग्यरीत्या काम पूर्ण करण्याचे आदेशित केले. सध्या धोकादायक भागास चारही बाजूने पोलिस बॅरिकेटिंग लावले आहे.
भविष्यात धोकादायक भागास घेऊन दुर्घटना होण्यापूर्वी धोकादायक रस्त्याचे काम पूर्ण करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात आली. या वेळी शहर अभियंता शिवकुमार वंजारी, अभियंता जितेंद्र पाटोळे, पूर्व विभागीय अधिकारी नितीन नेर व अन्य अधिकारी उपस्थित होते. घटनास्थळास लागूनच मोठी कचराकुंडी आहे.
या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कचरा पडून असतो. येथील कचराकुंडी कायमस्वरूपी हटविण्याबाबत नागरिकांनी मागणी करण्यात आली आहे. अद्याप परिस्थिती जैसे थे आहे. शनिवारीही मोठ्या प्रमाणावर कचरा पडून होता. महापालिका आयुक्तांच्या अचानक पाहणी दौऱ्याने स्वच्छता कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली. आयुक्त येत असल्याचे समजताच त्यांनी धावपळ करत कचराकुंडीची स्वच्छता केली. आयुक्त दाखल झाले तोपर्यंत स्वच्छता सुरू होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.