Nashik : NMC आयुक्तांकडून अतिक्रमित चौकांची पाहणी

NMC Commissioner Dr. Chandrakant Pulkundwar inspecting the encroached square.
NMC Commissioner Dr. Chandrakant Pulkundwar inspecting the encroached square. esakal
Updated on

नाशिक : वाहतूक नियंत्रण हा विषय महापालिकेचा नसला तरी चौकांमधील अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी होत असल्याच्या पोलिस प्रशासनाच्या सातत्याच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी बुधवार (ता. २) पासून शहरातील चौकाची पाहणी सुरू केली आहे. चौकामध्ये वाहतुकीच्या दृष्टीने अडचणीच्या ठरणारे अतिक्रमण तातडीने हटविण्याच्या सूचना देताना विशेष करून फॅनिंगचे अतिक्रमण तत्काळ हटविण्याच्या सूचना दिल्या. (Inspection of encroached intersection by NMC Commissioner Nashik Latest Marathi News)

महापालिका व पोलिस प्रशासनात झालेल्या बैठकीत वाहतुकीला अडथळा ठरणारे अतिक्रमण तातडीने हटविण्याची मागणी केली होती. अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी होत असल्याचा रोख पोलिसांचा होता. पोलिसांचा आरोप खोडून टाकण्यासाठी आयुक्त ॲक्शन मोडमध्ये आले आहे. आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनी विविध भागातील चौकांमध्ये पाहणी केली.

मिरची चौकासह सिद्धिविनायक चौक, नांदूर नाका चौक, तारवाला सिग्नल, जेल रोड, पेठ रोड, त्रिमूर्ती चौक, सिटी सेंटर मॉलजवळील संभाजी चौक, पश्चिम विभागातील एचडीएफसी चौक आदी चौकाची पाहणी केली. औरंगाबाद रोडवरील सिद्धिविनायक चौकात रस्त्याचे डिमार्केशन करणे, फॅनिंगचे डीमार्केशन करणे त्याचप्रमाणे अतिक्रमणधारकांना नोटिसा देऊन अतिक्रमण तातडीने काढून घेण्याची कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.

नांदूर नाका चौकात वाढत्या अतिक्रमणाच्या पार्श्वभूमीवर डीमार्केशन करून तातडीने अतिक्रमण हटविण्याच्या सूचना दिल्या. जेलरोड, इंगळे नगर येथे तसेच पंचवटी विभागातील तारवाला नगर सिग्नल येथे पोर्टलची तातडीने दुरुस्ती करणे. गतिरोधकावर प्लास्टिक पेंट मारणे, कॅटेज लावणे आणि लोकांना दिसतील अशा पद्धतीचे सायनेजेस लावणे, चौकाची दृश्यमानता वाढवण्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.

NMC Commissioner Dr. Chandrakant Pulkundwar inspecting the encroached square.
Nashik : ISKCON मंदिरात गोपाष्टमी, गोवर्धन पूजेचा उत्‍साह

पेठ रोड येथे अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकामधारकांना नोटिसा देणे, गतिरोधक टाकणे, झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे थर्मोप्लास्टिक पेंट करणे अशा सूचना केल्या. चोपडा लॉन्स ते गंगापूर नाका हा रस्ता स्मार्ट सिटी मार्फत विकसित करण्याच्या दृष्टीने सूचना दिल्या. पश्चिम विभागातील सिटी सेंटर मॉल जवळील संभाजी चौक या ठिकाणी पाहणी केली. सिडको विभागातील त्रिमूर्ती चौक येथे ही पाहणी केली.

अपघातग्रस्त चौकात पाहणी

दुर्घटना घडलेल्या मिरची चौकात मनपामार्फत केलेली कामे आणि अजून आवश्यक उपाययोजना या अनुषंगाने पाहणी केली. चौकात गतिरोधक टाकण्यात आले आहेत. प्लॅस्टिक पेंट करण्यात आलेला आहे. सायनेजिसदेखील लावण्यात आलेले आहेत. अतिक्रमण काढून झालेल्या ठिकाणी रस्त्याचे ड्रेसिंग करून त्या ठिकाणी दृश्यमानता वाढविण्याच्या दृष्टीने प्लॅनिंग क्लिअर करणे, नगर नियोजन विभागामार्फत रस्त्याचे डिमार्केशन करणे, दुभाजक टाकणे, कॅट आईज सायलेजेस बसविणे.

त्याचप्रमाणे राज्य सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अख्यात्यारीत असलेल्या रस्त्यावर वाहतूक नियंत्रणाच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना प्रभावीपणे राबविण्याच्या दृष्टीने त्यांना अवगत करणे अशी सूचना केली. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या रस्त्यावर देखील वारंवार अतिक्रमण विभागामार्फत पाहणी करून हॉकर्स, हातगाड्या हटविण्याचा आदेश दिला.

NMC Commissioner Dr. Chandrakant Pulkundwar inspecting the encroached square.
Nashik Bribe Crime News : सुरगाण्यात ACBच्या कारवाईत तिघेजण जाळ्यात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.