Inspirational News: संकटांवर मात करत सरलाताईंनी मिळवली खाकी वर्दी!

जिद्दीच्या जोरावर थेट पोलिस भरतीतून खाकी वर्दी मिळवलेल्या सरलाताई गवळी महिलांसाठी नक्कीच प्रेरणादायी बनल्या आहेत.
Saralatai Gavali
Saralatai Gavaliesakal
Updated on

मुलांच्या खेळण्या-बागडण्याच्या वयातच कपाळावरचं कुंकू नियतीनं हिरावून नेलं. मुलगा अवघा दोन वर्षांचा, तर मुलगी साडेचार वर्षांची असतानाच वडिलांचं छत्र हरपलं. डोंगराएवढ्या संकटातही खचून न जाता चिमुकल्यांसाठी ती खंबीरपणे उभी राहिली.

आयुष्य पुढे नेत असतानाच समोर जणू अंधारच दिसत होता. मात्र चिमुकल्यांसाठी संकटांची तमा न बाळगा उभे राहावेच लागेल, या सकारात्मक विचारांवर तिने पुन्हा आयुष्याला सुरवात केली.

परिस्थिती प्रतिकूल असतानाही मुलांसाठी आई-वडील होतानाच स्वयंपाकाची तसेच हातमजुरीची कामे करत पोलिस भरतीसाठी तयारी सुरू केली.

नियतीला आव्हान देतानाच चिमुकल्यांची जबाबदारी, घरखर्चासाठी कामे करतानाच जिद्दीच्या जोरावर थेट पोलिस भरतीतून खाकी वर्दी मिळवलेल्या सरलाताई गवळी महिलांसाठी नक्कीच प्रेरणादायी बनल्या आहेत. (Inspirational News Overcoming adversity Sarlatai gavali achieve police Khaki uniform nashik news)

सरला भागवत गवळी-चौगुले... माहेर धुळ्याजवळचे तिखी-डेडरगाव, तर सासर नाशिकचे... शिक्षण बारावी, आयटीआय... वडील भागवत सखाराम बारसे यांचे पत्नी आशाबाई यांच्यासह चार मुली, तीन मुले असं मोठं कुटुंब... बारसे कुटुंबातील सरलाताई या शेवट क्रमांकाच्या सदस्या होत्या.

सरलाताई अभ्यासात मुळातच हुशार, मात्र परिस्थितीमुळे कुटुंबासमोर जगण्याचा प्रवास सुरू होता. अशाही परिस्थितीत भागवत बारसेंनी मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष दिले. सरलाताई हुशार असल्याने वडिलांनी त्याना प्रोत्साहन दिले.

तिखी गावात रोजगाराच्या संधी नसल्याने सरलाताईंच्या वडिलांनी दूधविक्री करण्यासाठी थेट कुटुंबासह आपला मुक्काम धुळे शहरात हलवला. परिसरातील शेतकऱ्यांकडून दूध खरेदी करत धुळे शहरात विक्री सुरू केली.

शहरात शिक्षणाची सोय झाल्याने सरलाताईंसाठी एक संधी चालून आली. त्यातूनच दहावी-बारावीत त्यांनी शाळेत प्रथम क्रमांक पटकावत विश्वास सार्थ ठरवला. बारावीनंतर थेट ‘आयटीआय’चे प्रशिक्षण घेतले. याच काळात वडिलांनी सरलाताईंच्या विवाहाचा निर्णय घेतल्याने शिक्षण अर्ध्यावरच सुटले.

Saralatai Gavali
Inspirational News : परिस्थितीवर मात करत अंजलीताई बनल्या उद्योजिका

सरलाताईंवर दुःखाचे आकाश कोसळले

सरलाताई यांचा विवाह नाशिकमधील मनोज शिवाजी चौगुले यांच्याशी झाला. मनोज नाशिक येथे स्टँपवेंडर म्हणून सेवेत होते. एकत्र कुटुंबात संसाराचा गाडा पुढे नेत असतानाच बालपणापासूनच स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी सरलाताईंची धडपड सुरू होती.

शाळेत असताना क्रीडा स्पर्धांमध्येही त्यांनी चमक दाखवली होती. मात्र कौटुंबिक जबाबदारी लवकरच अंगावर आल्याने या सर्वांपासून त्यांना दूर जावे लागले. नाशिकमध्ये असतानाच मुलगी कस्तुरी व मुलगा विनय यांच्यानिमित्ताने कुटुंबात सदस्यसंख्या वाढली.

मुलांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देतानाच दोघा चिमुकल्यांसाठी त्या झटत होत्या. मात्र याच काळात पती मनोज यांचे आकस्मिक निधन झाल्याने सरलाताईंच्या पायाखालची जमीनच सरकली.

पतीच्या निधनावेळी मुलगी कस्तुरी साडेचार वर्षांची, तर मुलगा अवघा दोन वर्षांचा होता. पतीच्या अकाली जाण्याने अनेकदा स्वतःला संपविण्याचा विचार मनात येत होता. पण आपल्यानंतर दोन्ही मुलांचे काय होईल? या विचारात त्यांनी आत्महत्येचा निर्णय बदलला.

समोर काहीही पर्याय दिसत नसल्याने त्यांनी थेट माहेर गाठले. मुलांना वाढविण्याबरोबरच त्यांच्या शिक्षणासाठी दोन पैसे असावेत, यासाठी त्यांनी धुळे शहरात मेसमध्ये स्वयंपाकाचे काम केले.

त्यानंतर चैनी रोड परिसरातील दुकानांमध्ये कॅसेट भरण्याचे काम तुटपुंज्या मोबदल्यात सुरू केले. पुन्हा नव्याने उभे राहण्यासाठी पोलिस भरतीची तयारी सुरू केली.

२०१० मध्ये झालेल्या जळगाव पोलिस भरतीत यश खेचून आणले. मुलांचे शिक्षण, कुटुंबाची जबाबदारी यासोबतच पोलिस झाल्याने खाकी वर्दी मिळवल्याचा आनंद खूप मोठा होता.

Saralatai Gavali
Nashik Inspirational News: भुकेलेल्यांना अन्न; हीच खरी भक्ती! त्यांच्या नित्यनेमाने रुग्णांच्या नातलगांना दररोज मिळतेय भोजन

मुलीसोबत आईचीही स्वप्नपूर्तीकडे वाटचाल

पतीच्या निधनानंतर चिमुकल्यांची जबाबदारी पेलवत कष्टाच्या कामांसोबतच खाकी वर्दीचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या सरलाताई यांनी मुलांवर चांगले संस्कार देतानाच मुलगी कस्तुरी महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच स्केटिंग खेळामध्ये थेट राज्य पातळीवर चमकली.

मुलीसोबतच सरलाताई याही रायफल शूटिंगमध्ये सराव करताहेत. आयुष्यात स्वतःचं ध्येय साध्य करण्यासाठी मुलीसोबतच रायफल शूटिंगमध्ये यश मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

आयुष्यात स्वतःची ओळख उभी करतानाच आई-वडील, सासू-सासरे यांच्यासह राजश्री चौधरी, उज्ज्वला पाटील यांच्यामुळे आव्हाने पेलवू शकली, असे सांगताना मात्र त्या भावूक झाल्या.

Saralatai Gavali
Inspiring Story : पतीच्या निधनानंतर संघर्षातून मुलाला दाखविला यशाचा महामार्ग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.