Inspirational News : संस्काराचा वसा जपताना स्वतःची वाट जपत समाजासाठी काहीतरी करावं, या स्वबळावर त्यांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले. संस्कारक्षम कुटुंबाचा घटक होतानाच महिला म्हणून सक्षमीकरणाच्या चळवळीत योगदान देण्याचं जणू तिला माहेरूनच बाळकडू मिळालं होतं.
आयुष्यात आलेल्या अनेक चढ-उतारांत ध्येय साध्य करण्यासाठीचा जणू विडाच उचलला. उच्चशिक्षित कुटुंबातील भाग होतानाच समाजाच्या प्रवाहापासून दूर असलेल्या घटकांसाठी काम करत असतानाच बचत गटांसाठी आधार बनल्या, त्या पिंपळगाव बसवंत येथील सुषमाताई गायकवाड-सूर्यवंशी... (Inspirational News Sushmatai of Pimpalgaon became ambassador of women empowerment nashik news)
सुषमा परमानंद गायकवाड यांचे माहेर खानदेशातील साक्री तालुक्यातील निजामपूर जैताणे येथील... वाणिज्य शाखेतील पदवीधर असलेल्या सुषमाताई यांचे वडील उत्तमराव सूर्यवंशी शिक्षक होते.
समाजाला संस्कारांची वाट दाखवणाऱ्या उत्तमराव सूर्यवंशी यांच्या कुटुंबात पत्नी कलावती यांच्यासह दोन मुले योगेश, नितीन आणि दोन मुली असा परिवार. सुषमाताई कुटुंबात तीन क्रमांकाच्या.
समाजाच्या प्रवाहात योगदान देताना ज्या समाजात आपण जन्माला आलो, त्या समाजासाठी काही योगदान देणं आपली जबाबदारी आहे, असा जणू वारसाच या परिवाराने जपला. उपेक्षित घटकांसाठी काम करणाऱ्या कुटुंबाचा सदस्य होताना सुषमाताईंना बालपणापासूनच समाजकार्याची आवड निर्माण झाली.
सुषमाताई यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण साक्री तालुक्यातच झाले. त्यानंतर त्यांचा विवाह पिंपळगाव बसवंत येथील परमानंद गायकवाड यांच्याशी झाला. सासरे तहसीलदार असलेल्या गायकवाड परिवारातही समाजकार्याचा वसा जणू अंगवळणीच पडलेला होता.
उच्चशिक्षित कुटुंबाच्या सदस्या असल्या तरी गायकवाड परिवाराने जपलेला वसा सुषमाताई यांच्याकडे आला. पती परमानंद हेही शासकीय सेवेत होते. मात्र स्वतःच्या पायावर उभे राहतानाच आपलीही काही ओळख असावी, असा जणू सुषमाताई यांनी मनाशी चंगच बांधला होता.
पिंपळगाव परिसरातील महिला बचत गटांची चळवळ भक्कम करण्यास त्यांनी सुरवात केली. याच काळात सुषमाताई यांना पिंपळगाव येथे बँकिंग क्षेत्रात सेवेची संधी मिळाली.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
कुटुंबाचा आधार गेला
गायकवाड परिवारात मुलगा हर्शल, मयूर यांच्यानिमित्ताने कुटुंबाची संख्या वाढली. संस्कारांची वाट जपलेल्या कुटुंबात महिला सक्षमीकरणाची चळवळ भक्कम करताना मुलांच्या शिक्षणाकडेही वैयक्तिक लक्ष पुरवले.
मात्र याच काळात पती परमानंद गायकवाड यांचे अकाली निधन झाले. गायकवाड कुटुंबावर अचानक आलेल्या संकटातून कुटुंबाला सावरण्यासाठी सुषमाताई सरसावल्या. त्यांनी मुलांना आई-वडिलांच्या भूमिकेत राहून भक्कमपणे साथ दिली.
पाच हजार महिलांच्या आधार
परिसरातील बचत गटांसाठी सुषमाताई मोलाचा आधार बनल्या होत्या. परिसरातील बेहेड, कारसूळ, नारायण टेंभी, उंबरखेड, आहेरगाव, चिंचखेड, कोकणगाव, साकोरे आदींसह पिंपळगाव बाजारपेठेशी जोडलेल्या खेड्यांतील महिलांचे संघटन करत त्यांना बचतगट स्थापनेत सुषमाताई यांचं योगदान मोलाचं ठरलं.
पिंपळगाव बसवंत शहरासह परिसरातील सुमारे पाच हजारांवर महिलांसाठी त्यांचं योगदान मोलाचं होते. बँकेत खाते उघडण्यापासून ते शासकीय योजनांची माहिती देणे, बचत गटांसाठी प्रशिक्षण कार्यशाळा घेणे, मार्केटिंगची माहिती देणे आदी कामांत त्यांनी महिलांना मार्गदर्शन करतानाच ‘चूल आणि मूल’ या पारंपरिक गर्तेतून बाहेर काढण्यात त्या यशस्वी ठरल्या.
याशिवाय कुटुंबातील किरकोळ कलह, शेतजमिनीचे वाद सामोपचाराने मिटविण्यासाठीही त्यांचा पुढाकार मोलाचा ठरत आहे. समाजाप्रति असलेली निष्ठा भक्कम करतानाच सामाजिक क्षेत्रात आपली भूमिका बजावताना मुलगा हर्शल, मयूर, सून स्वाती यांचंही योगदान मोलाचे असल्याचे त्या सांगतात.
ज्येष्ठांसाठी उभं राहायचं
समाजासाठी दुर्मिळ ग्रंथ म्हणून मोलाची भूमिका बजावणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या वाट्याला निवृत्तीनंतर कुचंबणा येते. अशा ज्येष्ठ नागरिकांसाठी भविष्यात उपक्रम राबविण्यासाठी त्या प्रयत्नशील आहेत.
परिस्थितीमुळे अनेकदा आपल्या व्यथा समाजासमोर मांडण्यासाठी मर्यादा असलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र सुरू करण्याचा मानस असल्याचे त्या सांगतात.
तनिष्का व्यासपीठाने दिलं बळ
जगभर आलेल्या कोरोना महामारीला सुषमाताई गायकवाड यांच्या बचत गटांनी संधी म्हणून बघत याच काळात मास्क शिवण्याचे काम केले. या कामातून महिलांना लाखो रुपयांची कमाई झाली.
महिला सक्षमीकरणाच्या या चळवळीत सुषमाताई यांच्याबरोबरच येथील तनिष्का गटप्रमुख शोभा भागवत, वृषाली कदम यांचेही सहकार्य मोलाचे असल्याचे त्या अभिमानाने सांगतात. बचत गटांसाठी योगदान देतानाच ‘सकाळ’ माध्यम समूहाच्या तनिष्का व्यासपीठाच्या गटप्रमुख म्हणूनही त्यांचे योगदान मोलाचे ठरलंय.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.