Inspirational Story : फिरत्या विक्रेत्या ज्योती भावसार बनल्या उद्योजिका

Inspirational Story परिस्थिती माणसाला जगायला शिकवते, मात्र जगण्याच्या लढाईत आलेल्या संकटांत संयम महत्त्वाचा, या सकारात्मक विचारांची पाठराखण ती करत राहिली.
Jyoti Bhavsar
Jyoti Bhavsaresakal
Updated on

Inspirational Story : परिस्थिती माणसाला जगायला शिकवते, मात्र जगण्याच्या लढाईत आलेल्या संकटांत संयम महत्त्वाचा, या सकारात्मक विचारांची पाठराखण ती करत राहिली. हमाली कामापासून ते धान्यासाठी लागणारे बारदान शिवत कुटुंबाची जबाबदारी सांभाळणाऱ्या परिवारात तिचा जन्म झाला.

संकटं जिद्द पाहण्यासाठीच येत असतात, असा जणू जगण्याचा सारिपाठच तिने स्वतःसाठी घालवून दिला. (Inspirational Story of Jyoti Bhavsar entrepreneur )

शालेय जीवनातही शिक्षणाबरोबरच अर्धवेळ कामासाठी बाहेर पडतानाच माहेरचा आधार बनली. विवाहानंतरही हाच दिनक्रम सुरू ठेवताना कधीकाळी गल्लोगल्ली दोन वर्षाच्या बाळाला कडेवर घेऊन बेनटेक्स ज्वेलरी विक्री केली. आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही जिद्दीच्या जोरावर बेनटेक्स ज्वेलरीपासून ते थेट हुरडा पालक वडी तयार करण्याच्या व्यवसायातून स्वतःची ओळख उभ्या केलेल्या उच्चशिक्षित ज्योतीताई भावसार महिलांसाठी आदर्श ठरल्या आहेत.

नाशिक शहराच्या पंचवटी येथील माहेर व नवीन नाशिकच्या राजीवनगर येथील सासर असलेल्या ज्योती प्रशांत भावसार यांचे शिक्षण एम.ए.पर्यंतचे. वडील सुरेश भीमराव भडांगे यांचे पत्नी मंगला यांच्यासह दोन मुली व १ मुलगा असा परिवार. गरीबी जणू भडांगे कुटुंबाची रोजच परीक्षा घेत होती.

रोजचा दिवस जणू आव्हाने घेऊन येणारा ठरलेलाच. सुरेश भडांगे पंचवटी परिसरात हमालीकाम करत होते. याशिवाय धान्यासाठी बारदान शिवण्याचेही काम करत कुटुंबाला आर्थिक आधार देण्यासाठी त्यांची धडपड सुरू होती. तुटपुंज्या मोबदल्यात कुटुंबासाठी स्थैर्य देतानाच पत्नी मंगला याही घरकामातून मदत करत होत्या.

Jyoti Bhavsar
Inspiring Story : पतीच्या निधनानंतर संघर्षातून मुलाला दाखविला यशाचा महामार्ग

मात्र आर्थिक तोंडवमिळवणी करणे अवघडच होत होते. मुळातच अभ्यासात हुशार असलेल्या ज्योतीताई यांनी आई- वडिलांना मदत व्हावी, यासाठी दहावीत असतानाच अर्धवेळ दवाखान्यात रिसेप्शनिस्ट म्हणून काम शोधत अर्थार्जनासाठी प्रयत्न सुरू केले.

दहावीनंतर महाविद्यालयीन शिक्षण घेतानाच अंबड येथील रिचार्ज व्हाऊचर्स तयार करणाऱ्या कंपनीत प्रेस ऑपरेटर म्हणूनही काम केले. भडांगे कुटुंबातील कमावता सदस्‍य म्हणून ज्योतीताई यांनी जबाबदारी खांद्यावर घेतली, मात्र या सर्व व्यवस्थेत शिक्षणाकडेही लक्ष देत त्यांनी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. कुटुंबाची जबाबदारी कमी करताना भडांगे परिवाराने ज्योतीताई यांचा विवाह नाशिकमधील प्रशांत भावसार यांच्याशी झाला.

अखंडित कष्टाची मालिका

पती यांचेही शिक्षण पदवीपर्यंतचे. प्रशांत हेही नाशिकमधील एका कंपनीत हंगामी कामगार म्हणून नोकरी करत होते. सासरी एकत्र कुटुंब असल्याने आर्थिक ओढाताण लक्षात घेऊन काहीतरी करण्याची जिद्द ज्योतीताई बाळगून होत्या. त्यांच्या प्रयत्नांना नेहमीच प्रोत्साहन देत पती प्रशांत यांनी पाठबळ दिले.

Jyoti Bhavsar
Inspiring Story : गणेश जोगदंड बनला सांख्यिकी सहाय्यक

नवीन नाशिक परिसरातील गरज ओळखून त्यांनी नोकरी करण्यापेक्षा व्यवसायासाठी प्रयत्न सुरू केले. याच काळात मुलगा अद्वंत व देवांश यांच्यानिमित्ताने कुटुंब वाढले. पतीकडून पाचशे रुपये घेत बेनटेक्स ज्वेलरी खरेदी केली. प्रश्न होता विक्रीचा. यातही मार्ग काढत ज्योतीताईंनी थेट नवीन नाशिकमध्ये गल्लोगल्ली जाऊन व्यवसायाला सुरवात केली.

यामुळे दुकानाचे भाडे अथवा जागेसाठी भाडे देण्याचा प्रश्नच नव्हता. गल्लोगल्ली जाऊन व्यवसायाला पुढे नेताना कडेवर दोन वर्षाच्या चिमुरड्याला सोबत नेत व्यवसायात स्वतःला झोकून दिले. परिसरातील गरज ओळखून त्यांनी बेनटेक्स ज्वेलरी विक्रीसोबतच पर्यायी व्यवसायाच्या शोधात ज्योतीताई होत्या.

फिरता विक्रेत्या ते उद्योजिका

फिरत्या विक्रेत्या म्हणून कुटुंबासाठी आधार ठरत ज्योतीताई यांनी कुटुंबासाठी दिलेला आर्थिक आधार मोलाचा ठरला. बचत गटाच्या माध्यमातूनही त्यांनी महिलांसोबत प्रशिक्षण घेत स्वतःला अपडेट केले. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या सहकार्याने बचत गटांच्या प्रशिक्षणातून वेगवेगळे पदार्थ तयार करण्याचे प्रशिक्षण घेतले.

Jyoti Bhavsar
Inspirational Story : मोलकरणीची कामे करीत व्यवसायातून उभारी

घरगुती खाद्यपदार्थ तयार करत विक्री सुरू केली. नागलीपासून तयार केलेल्या पदार्थांची मागणी लक्षात घेऊन नागलीपासून तयार केलेले मोदक, केक, ढोकळा, थालीपीठ विक्रीला त्यांना प्रतिसाद मिळत गेला. येथूनच ज्योतीताई यांच्या प्रगतीचा आलेख वाढत गेला.

हुरडा पालक वडीने दिली ओळख

नागली पदार्थांसोबतच तांदळाची चकली तसेच हुरडापासून तयार केलेल्या पालक वडीने ज्योतीताई यांची ओळख सर्वदूर नेली. विक्री प्रदर्शनांव्यतिरिक्त वेगवेगळ्या भागांतून वडीला येणारी मागणी खवय्यांसाठी पसंती दाखवणारी ठरली. हुरडा पालक वडी विक्रीतून पहिल्याच दिवशी २८० रुपयांची कमाई झाली. येथूनच ज्योतीताई यांच्या आत्मविश्वासाला बळकटी मिळाल्याने विक्री प्रदर्शनांमध्ये स्वतंत्र ओळख उभी केली.

Jyoti Bhavsar
Inspirational Story : खचलेल्या मनांसाठी शोभाताई ठरल्या ‘आयडॉल’!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.