Nashik News: वाढलेली वाहतूक नियंत्रित करा; आमदार सुहास कांदे यांचे निर्देश

Nashik News: वाढलेली वाहतूक नियंत्रित करा; आमदार सुहास कांदे यांचे निर्देश
Updated on

Nashik News: मनमाड येथील उड्डाणपुलाच्या भरावाच्या दुरुस्तीच्या कामाला गती मिळावी यासाठी पाठपुरावा सुरू असून नांदगाव शहरातून वळविण्यात आलेली अतिरिक्त वाहतूक नियंत्रणात आणावी असे निर्देश आमदार सुहास कांदे यांनी आज पोलिस, पालिका, सार्वजनिक बांधकाम व हायवे प्राधिकरणाला दिले.

आमदार कांदे यांच्या सूचनेवरून विश्रामगृहात शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते व माध्यम प्रतिनिधींची यंत्रणेतील घटकांसोबत वाढत्या वाहतुकीबाबत तातडीची आढावा बैठक घेण्यात आली. त्या संयुक्त बैठकीत आमदार कांदे यांनी दूरध्वनीवरून यंत्रणेतील अधिकाऱ्यांना उपाययोजनेबाबत निर्देश दिले. ( Instruction of MLA Suhas Kande to control increased traffic nashik news)

मनमाड येथील पुलाचा भराव काही प्रमाणात खचल्याने सुरक्षितता म्हणून त्या भागातील वाहतूक नांदगाव शहरातून वळविण्यात आल्याने मोठ्या प्रमाणात अतिरिक्त स्वरूपात रहदारी वाढली आहे. यामुळे कोणताही अपघात होऊ नये, कोणाला त्रास होऊ नये अशा पद्धतीने नियोजन करावे अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.

मनमाड येवला मार्गावरील वाहतूक बंद केल्यामुळे मालेगाव- धुळ्याहून येणाऱ्या सर्व गाड्या नांदगावमार्गे येवला अशा जात आहेत. यामुळे नांदगाव शहरात मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची रहदारी वाढली असून अपघातांचे प्रमाण वाढले आहे, काल अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर आज तातडीची बैठक बोलावून सर्व प्रशासकीय स्तरावर रहदारी नियंत्रणाच्या आदेश देण्यात आले.

ठिकठिकाणी स्पीड ब्रेकर बसविण्याच्या सूचना केलेल्या आहेत. पोलिस प्रशासन व नगरपालिका प्रशासनाला त्वरित रहदारी जास्त असलेल्या ठिकाणी रहदारी नियंत्रित करण्यासाठी आपले कर्मचारी नेमण्याच्या सूचना करण्यात आल्या.

Nashik News: वाढलेली वाहतूक नियंत्रित करा; आमदार सुहास कांदे यांचे निर्देश
Wedding Season: तुलसी विवाहानंतर आता लग्नसोहळ्यांचा धूमधडाका; वधू-वर संशोधन मोहिमेस वेग

पोलिस प्रशासन व नगरपालिकेत प्रशासनाने तत्काळ रहदारी नियंत्रणासाठी कर्मचारी उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले. सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे आवश्यक त्या ठिकाणी स्पीड ब्रेकर बसवणे व खड्डे रिपेअर करून देण्याचे सांगण्यात आले.

आमदार सुहास कांदे यांच्या संपर्क कार्यालयातर्फे महाविद्यालय, न्यू इंग्लिश स्कूल, स्टेट बँक, शनी मंदिर, रेल्वे स्टेशन परिसर व उड्डाणपूल, गंगाधरी बायपास, येवला रोड आदी ठिकाणी वाहनचालकांसाठी जनजागृतीपर दिशादर्शक फलक लावण्यात आले. वर्दळीच्या ठिकाणी रिक्षाद्वारे ध्वनिक्षेपक लावून आवाहन करण्यात येत होते.

आढावा बैठकीला बैठकीला नायब तहसीलदार चेतन कोणकर, पोलिस निरीक्षक प्रीतम चौधरी, महसूलचे योगेश पाटील, सार्वजनिक बांधकाम व हायवे प्राधिकरणाचे प्रतिनिधी म्हणून हर्षल चौधरी, संदीप निकम, पालिकेचे अरुण निकम यांच्यासह माजी सभापती विलासराव आहेर, विष्णू निकम, सुधीर देशमुख, डॉ. सुनील तुसे, शिवसेनेचे शहरप्रमुख सुनील जाधव, बाजार समितीचे संचालक समाधान पाटील, अमोल नावंदर, रघुनाथ सांगळे, युवा सेनेचे तालुकाप्रमुख सागर हिरे, रमेश काकळीज, पोपट सानप, बापूसाहेब जाधव, भय्या पगार, डॉ. प्रभाकर पवार, शशी सोनवणे, राजेंद्र पवार, प्रकाश शिंदे, मुज्जू शेख, मयूर लोहडे, भरत पारख आदी उपस्थित होते.

Nashik News: वाढलेली वाहतूक नियंत्रित करा; आमदार सुहास कांदे यांचे निर्देश
Nashik News: अंत्यविधी, दफनविधीचा खर्च करण्याचा चाटोरी ग्रामपंचायतीचा निर्णय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.