Namami Goda Project: जलशक्ती मंत्रालय प्रकल्पासाठी आग्रही; लोकसभा निवडणुकीपूर्वी प्रस्तावाला मंजुरीचे संकेत

godavari river
godavari riveresakal
Updated on

Namami Goda Project: गोदावरी प्रदूषणमुक्त करण्यासाठी महत्त्वाचा ठरणारा ‘नमामि गोदा’ प्रकल्प नाशिकला देण्यासाठी केंद्रीय जलशक्ती मंत्रालय उत्सुक असले तरी महापालिकेकडून सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करण्यास विलंब होत आहे.

यामुळे अखेरीस या मंत्रालयाकडूनच किमान चर्चा करायला तरी या असा निरोप आल्यानंतर महापालिका प्रशासनाकडून दोन दिवस आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी ठाण मांडले.

दरम्यान, मलनिस्सारणासह नमामि गोदा प्रकल्पाचा संयुक्त अहवाल जलशक्ती मंत्रालयाला सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. (Instructions for submission of Namami Goda Project Report to Ministry of Water Power nashik news)

२०२७-२८ मध्ये नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा होत आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाकडून ‘नमामि गोदा’ प्रकल्प सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यासाठी जवळपास १८०० कोटी रुपये निधी देण्याची तयारी दर्शविली होती. महापालिकेला नमामि गोदा प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करण्याच्या सूचना २०२२ मध्ये देण्यात आल्या.

नमामि गोदा प्रकल्पांतर्गत गोदाघाटांचे सुशोभीकरण करण्याबरोबरच अस्तित्वात असलेल्या जुन्या मलवाहिन्या बदलणे व मलनिस्सारण केंद्रांची क्षमतावाढ, आधुनिकीकरण, मखमलाबाद व कामटवाडा मलनिस्सारण केंद्र निर्मिती, नववसाहतींमध्ये सिवर लाइनचे जाळे टाकणे, औद्योगिक प्रदूषित पाणी एसटीपीच्या माध्यमातून पुनर्वापर करण्यासाठी यंत्रणा उभारणे या कामांचा समावेश आहे.

एकीकडे नमामि गोदा प्रस्ताव सादर केला असताना दुसरीकडे जलशक्ती मंत्रालयाने राष्ट्रीय नदी संवर्धन योजनेअंतर्गत शहरातील मलनिस्सारण केंद्रांची क्षमतावाढ व आधुनिकीकरण तसेच मलजलवाहिन्यांचे जाळे विकसित करण्यासाठी ५३० कोटी रुपये खर्चाचा स्वतंत्र प्रस्ताव सादर केला.

godavari river
Nashik Water Scarcity: वापर वाढल्याने कृत्रिम पाणीटंचाई; सिडको, जुने नाशिक भागात मोटारीद्वारे उपसा

दोन्ही प्रस्तावासंदर्भात दिल्लीत बैठक झाली. केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या राष्ट्रीय नदी संवर्धन योजनेचे संचालक अशोक बाबू यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीला महापालिका आयुक्त डॉ. करंजकर हजर राहीले. नमामि गोदा व मलनिस्सारण केंद्र सक्षमीकरणाचे दोन्ही संयुक्त प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या.

तंत्रज्ञानावर आधारित केंद्र

संयुक्त प्रस्ताव सादर करताना अस्तित्वातील मलनिस्सारण केंद्रांतील यंत्रणा कालबाह्य ठरल्या आहेत. त्यामुळे केंद्रांची क्षमतावाढीपुरते मर्यादित न राहता नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून मलनिस्सारण केंद्रांची उभारणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

नमामि गोदा व मलनिस्सारण केंद्र सक्षमीकरणासाठी केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाकडून निधी मिळणार आहे. परंतु असे असतानाही महापालिका व जलशक्ती मंत्रालयात समन्वय साधला गेला नाही. त्यामुळे आयुक्त डॉ. करंजकर यांनी पुढाकार घेत प्रस्तावासाठी बैठक घडवून आणली.

असा होईल प्रकल्पावर खर्च (कोटी रुपये)

- मलनिस्सारण केंद्र अद्ययावत व सक्षम करणे.- ३९८.१८ कोटी

- नववसाहतीत मलवाहिका टाकणे.- ९२७.३४

- नवीन मलनिस्सारण केंद्रनिर्मिती-६२२.०९

- नदीघाट विकास व सौंदर्यीकरण- ८३२.६३

godavari river
Diwali 2023 : वसुबारसेला गोदाघाटावर गोदा दीपोत्सव 2023; श्रीरामकृष्ण संस्थान व मनपाच्या संयुक्त विद्यमाने उपक्रम

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.