Chhagan Bhujbal: समन्वयातून कामे वेळेत पूर्ण करावी; मंत्री छगन भुजबळ यांच्या सूचना

While inspecting the development works after the review meeting of officials in Yewala, Niphad taluka, Mr. Bhujbal
While inspecting the development works after the review meeting of officials in Yewala, Niphad taluka, Mr. Bhujbalesakal
Updated on

Chhagan Bhujbal : पाऊस लांबल्याने पाण्याचे नियोजन करा, पिण्याच्या पाण्यासाठी टँकर्स गरजेनुसार सुरू ठेवा तसेच सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी आपल्या कामांचे योग्य नियोजन करून विकासकामे जलदगतीने वेळेत पूर्ण करावीत अशा सूचना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राह‍क संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या. (Instructions of Minister Chhagan Bhujbal Work should be completed in time through coordination at yeola nashik)

येथील संपर्क कार्यालयात येवला, निफाड तालुक्यातील अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. अधिकाऱ्याकडून भुजबळ यांनी प्रत्येक विभागाचा आढावा घेतला.

येवल्याचे प्रांताधिकारी बाबासाहेब गाढवे, निफाडच्या प्रांताधिकारी हेमांगी पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सुधाकर मोरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता उदय पालवे यांच्यासह स्थानिक अधिकारी उपस्थित होते.

‘पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे सध्या धरणातील पाणीसाठा कमी आहे. त्यामुळे पाण्याचे सुयोग्य नियोजन करावे. ज्या ठिकाणी टँकर्सची आवश्यकता आहे, तेथे संख्या वाढविण्यात यावी. अद्यापही पीककर्जाचा लाभ मिळालेल्यांना तो मिळावा यासाठी नियोजन करावे.

खरीप हंगामाच्या दृष्टीने पीकनिहाय लागणाऱ्या खतांचा साठा मुबलक प्रमाणात ठेवावा. बोगस बियाणे व खतांची विक्री होणार नाही याकडे प्राधान्याने लक्ष देण्याचे निर्देश मंत्री श्री. भुजबळ यांनी दिले.

पाणीयोजनेचे काम १२ पर्यत पूर्ण करा

विंचूरसह सोळा गाव पाणी पुरवठा योजनेच्या जलवाहिनीची उर्वरित कामे १२ ऑगस्टपर्यंत तातडीने पूर्ण करण्यात यावीत अशा सूचना श्री. भुजबळ यांनी दिल्या. हे कम बंद असल्यने विंचूर, लासलगाव येथील पाणीप्रश्न गंभीर झाला आहे, तो तातडीने दूर व्हावा याकडे त्यांनी अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले.

येवला शहराला ऑगस्ट महिन्यापर्यंत पाणी पुरेल यादृष्टीनेही नियोजन करावे. पावसाळ्यात साथरोगांबाबत आरोग्य यंत्रणेने सतर्क रहावे. साथरोग नियंत्रणाच्या दृष्टीने शहरात स्वच्छता कायम ठेवावी, त्यात खंड पडता कामा नये.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

While inspecting the development works after the review meeting of officials in Yewala, Niphad taluka, Mr. Bhujbal
Nashik Crop Insurance: जिल्ह्यातील साडेतीन लाख शेतकऱ्यांचा ‘पीकविमा’! 3 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

येवल्यातील व्यापारी संकुलातील गाळ्यांबाबत त्यांनी सूचना दिल्या तसेच प्रशासकीय संकुलाची दुरुस्ती व डागडुजीची कामे तप्तरतेने पूर्ण करून नागरिकांना एकाच छताखाली सर्व कार्यालये उपलब्ध होतील हे पाहावे.

येवला व निफाड तालुक्यातील नवीन जाहिरमान्यानुसार स्वस्त धान्य दुकानांची परवाने विहित कार्यपद्धतीनुसार वितरित करून रास्त भाव दुकाने सुरू करावीत. लासलगाव बाह्यवळण रस्त्याची कामे तातडीने पूर्ण करावीत. आवश्यक भूसंपादन प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना मंत्री श्री. भुजबळ यांनी दिल्या.

बैठकीला निफाडचे तहसीलदार शरद घोरपडे, येथील तहसीलदार आबा महाजन, मुख्याधिकारी किरण देशमुख, गटविकास अधिकारी महेश पाटील व मच्छिंद्र साबळे, पोलिस निरीक्षक नंदकुमार कदम, बांधकाम विभागाचे अभियंता रवींद्र पुरी, श्री. कुलकर्णी, उपअभियंता सागर चौधरी, गणेश चौधरी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शरद कातकाडे, डॉ. सुजित कोशिरे, बालविकास प्रकल्प अधिकारी आरती गांगुर्डे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

विकासकामांची पाहणी

शहरात सुरू असलेल्या शहर पोलिस ठाण्याच्या कामांची भुजबळ यांनी पाहणी करून विविध सूचना केल्या. शहरात जुने तहसील

कार्यालय परिसरात हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याच्या जागेची पाहणी करून हा दवाखाना एक महिन्यात कार्यान्वित करण्याचे निर्देश दिले.

While inspecting the development works after the review meeting of officials in Yewala, Niphad taluka, Mr. Bhujbal
Nashik 11th Admission: अद्यापही 11 हजार जागा रिक्‍त! विशेष फेरीची मुदत संपली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.