उन्हाच्या झळा पशु- पक्ष्यांच्या जीवावर | Nashik

Intense summer causes heatstroke on birds & animals Nashik News
Intense summer causes heatstroke on birds & animals Nashik Newsesakal
Updated on

खामखेडा (जि. नाशिक) : सध्या पाळीव, जंगली प्राण्यांनाही उच्च तापमानाचा फटका बसत आहे. तीव्र उन्हाचे चटके बसू लागताच प्रत्येक जण पाणी अथवा गारवा शोधतो. माणसाला ही गरज पूर्ण करणे सहज साध्य होते. मात्र, प्राणी व पक्ष्यांना नैसर्गिक स्रोतांमधून आपली गरज भागवावी लागत असल्याने उन्हाळा नकळत अनेक पशु- पक्ष्यांच्या जीवावर बेततो आहे. भटकी जनावरे, श्‍वान, माकड व पक्षीही त्यास अपवाद राहिले नसून, ते उष्माघाताचे (Heatstroke) शिकार होत आहे.

उष्णतेमुळे सध्या पाळीव कुत्री, माकडे यांना मोठ्या प्रमाणावर अतिसाराच्या (diarrhoea) समस्येला सामोरे जावे लागत आहे. तर काही मोकाट श्‍वान, खार, पक्षी, मोरांचा उष्माघातामुळे मृत्यू झाल्याचे निदर्शनास येत आहे. पाळीव प्राणी देखील बेहाल झाले आहेत. पाळीव प्राण्यांना दिवसातून चार- पाचवेळा पाणी दाखवावे लागत असल्याचे शेतकरी सांगतात. मागील पंधरवाड्यात जनावरांना खासगी डॉक्टरांकडे नेण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. जंगल परिसरात उन्हामुळे पाण्याचे श्रोत आटल्याने मोठ्या प्रमाणावर जंगलातील पक्षी शेत- शिवारात दिसू लागले आहेत.

Intense summer causes heatstroke on birds & animals Nashik News
मालेगाव महानगरपालिकेला लाभले दोन उपायुक्त; सहाय्यक आयुक्त पद रिक्तच

आजाराची कारणे

अचानक वातावरणीय बदल, अति तापमान, श्‍वानांना नियमित लस न देणे, दूषित पाणी पिणे, श्‍वानांच्या अंगावर पाणी टाकणे यामुळे पाळीव श्‍वानांना अतिसार, उष्माघात होत आहे.

उपाय

श्‍वानाला थंड जागी ठेवणे, इतर श्‍वानांचा संपर्क न होऊ देणे, लसीकरण नियमित करणे, स्वच्छ पाणी पाजणे, श्‍वानांची जागा स्वच्छ आणि स्वतंत्र ठेवणे.

Intense summer causes heatstroke on birds & animals Nashik News
Nandurbar | ST आगारात 400 कर्मचारी हजर

"जनावरे व श्‍वानांना लवकर सकाळी आणि संध्याकाळी खाद्य, स्वच्छ सावली, पिण्याचे स्वच्छ पाणी आणि उन्हापासून बचाव होईल, अशी व्यवस्था करावी. उन्हात जनावरे येणार नाही, याची काळजी घ्यावी."

- योगेश सोनवणे, पशुधन अधिकारी, खामखेडा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.