ZP Staff Transfer : अखेर मुख्यालयातील कर्मचाऱ्यांचे टेबल बदलणार! 38 कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या

Transfers
Transfersesakal
Updated on

Nashik News : जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांची बदली प्रक्रिया पार पडल्यानंतर वर्षोनुवर्षे एकाच टेबलावर व विभागात ठाण मांडून असलेल्या कर्मचाऱ्यांचीही उचलबांगडी करत अंतर्गत बदल्यांचा निर्णय प्रशासनाने घेतला खरा. (Internal transfers of 38 employees in various departments at zp on 5 june nashik news)

मात्र, त्यास मुहूर्त मिळत नव्हता. अखेर मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी सोमवारी (ता. ५) या बदल्या करण्यास हिरवा कंदील दाखविला. त्यामुळे मुख्यालयातील विविध विभागांतील ३८ कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या करण्याची तयारी सामान्य प्रशासन विभागाने केली आहे.

जिल्हा परिषद व पंचायत समिती कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना एकाच टेबलावर जास्तीत जास्त तीन व एका विभागात जास्तीत जास्त पाच वर्षे काम करता येईल, असा शासन आदेश आहे. त्यानुसार अंतर्गत बदल्या होणे आवश्यक आहे. मात्र, अनेक वर्षांपासून ती प्रक्रिया झालेली नाही.

दोन वर्षांपूर्वी लेखा व वित्त विभागातील बदल्यांबाबत ओरड झाल्याने, या विभागातील बदल्या झाल्या होत्या. मात्र, इतर विभागांतील अंतर्गत बदल्यांची घोषणा होऊनही मुहूर्त लागला नाही. बांधकाम एक, दोन व तीन, जलसंधारण, लेखा विभागात वर्षोनुवर्षे एकाच टेबलावर कर्मचारी ठाण मांडून असल्याने तेथे या कर्मचाऱ्यांची ‘संस्थाने’ तयार झाली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Transfers
Nashik: मदरशात शिक्षणाच्या नावाखाली लहान मुलांची तस्करी? तपासासाठी दोन पथके सांगली बिहारकडे रवाना

त्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेऊन आशिमा मित्तल यांनी अंतर्गत बदल्या करण्याचा निर्णय घेतला होता. त्याबाबतचे पत्र सर्व विभागांना देण्यात आले. मात्र, ही बदली प्रक्रिया होऊ नये, यासाठी अनेकांकडून जोरदार प्रयत्न सुरू होते. अनेकांनी बदली प्रक्रिया झाल्यास कामकाजावर परिणाम होण्याची ओरडही केली.

तर काही कर्मचारी या बदल्यांसाठी आग्रही असल्याचे दिसून आले. यातच विभागांकडून प्रस्ताव प्राप्त होऊनही अंतर्गत बदल्यांची तारीख निश्चित होत नसल्याने बदल्यांबाबत संभ्रम निर्माण झाला होता. अखेर गुरुवारी (ता.१) मुख्य कार्यकारी अधिकारी मित्तल यांनी अंतर्गत बदल्यांसाठी ५ जून ही तारीख दिली आहे. त्यामुळे मुख्यालयातील ठाण मांडून असलेल्या कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

तक्रारी असलेल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या करा

दरम्यान, अनेक विभागांतील कर्मचाऱ्यांनी या बदली प्रक्रियेस विरोध केला आहे. या बदल्या करण्यापेक्षा तक्रारी असलेल्या टेबलावरील कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याची मागणी कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे. अनेक विभागांत टेबलावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मोठ्या तक्रारी आहेत. या तक्रारी असलेल्या कर्मचारी वर्गाचेही टेबल बदलण्यात यावे, अशी मागणी कर्मचारी वर्गाकडून होत आहे.

Transfers
Diploma Course Admission : डिप्‍लोमा प्रवेश नोंदणीची या तारखेपर्यंत मुदत; जाणुन घ्या प्रवेश वेळापत्रक..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.