International Satsang Ceremony : नेपाळमध्ये आज रुद्राक्ष लिंगार्चन सोहळा

 A magnificent body prepared for the extravagant lingarchan ceremony and  Devotees worshiping Gurumauli Annasaheb More.
A magnificent body prepared for the extravagant lingarchan ceremony and Devotees worshiping Gurumauli Annasaheb More. esakal
Updated on

International Satsang Ceremony : अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठाच्या वतीने उद्या (ता.९) नेपाळमधील काठमांडू महानगरात ‘श्री. अतिरुद्रात्मक रुद्राक्ष लिंगार्चन व श्री. ललिता सहस्रनाम पठणाचा’ भव्यदिव्य सोहळा होत आहे.

आज या कार्यक्रमासाठी गुरुमाउली आण्णासाहेब मोरे आणि सेवामार्गाचे देशविदेश अभियान प्रमुख नितीनभाऊ मोरे यांचे आगमन झाले. (International Satsang Ceremony Rudraksha Lingarchan ceremony today in Nepal nashik news)

नेपाळ येथील गोदावरी सेवा केंद्राच्या स्थानिक महिला पुरुष सेवेकऱ्यांनी मोठ्या उत्साहात व पारंपरिक पद्धतीने भावभक्तीने गुरुमाउलींचे भव्य स्वागत केले. त्यानंतर उत्तर गोदावरी तीर्थ येथील गंगापूजन गुरुमाउलीनी केले.

नेपाळ येथील पहिल्या आंतरराष्ट्रीय स्वामी सेवा केंद्रात गुरुमाउलीनी भेट देऊन नेपाळ येथील कार्याचा गौरव केला. कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येस गुरुमाउलींनी तयारीचा आढावा घेऊन आवश्यक त्या सूचना केल्या.

या ‘श्री. अतिरुद्रात्मक रुद्राक्ष लिंगार्चन व श्री. ललिता सहस्रनाम पठण’ अशा अत्युच्च सेवेसाठी कार्यक्रम स्थळ सज्ज झाले असून एक लाखापेक्षा अधिक रुद्राक्षांची अकरा फूट उंच भव्य पिंड बनविण्यात आली आहे. सेवामार्गाच्या यज्ञयाग विभागातील सेवेकरी ही पिंड बनविण्याचे काम गेली अनेक दिवस करत होते. प्रत्यक्ष कार्यक्रमस्थळी स्वयंसेवक सेवेकरी गेल्या महिन्यांपासून तयारीत गुंतले होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

 A magnificent body prepared for the extravagant lingarchan ceremony and  Devotees worshiping Gurumauli Annasaheb More.
Female Health : स्त्रीरोग, प्रसूतीशास्त्र काळानुसार बदलते वास्तव!

सेवामार्गाच्या देश विदेश अभियानाचे प्रमुख नितीनभाऊ मोरे हे स्वतः येथील तयारीवर लक्ष ठेऊन होते. सोहळ्यात सहभागी होण्यासाठी भारतभरातून आणि नेपाळमधून हजारो सेवेकरी आज पोचले आहेत.

प्रत्यक्ष कार्यक्रम स्थळी मंडप, व्यासपीठ उभारणी, ध्वनी, प्रकाश योजना,पार्किंग, सुरक्षा व्यवस्था, महाप्रसाद तयारी, वाटप, येणाऱ्या भाविकांची निवास व्यवस्था, येणाऱ्या भाविकास सर्व गोष्टींचे मार्गदर्शन करणे अशा सर्व लहान, मोठ्या गोष्टींसाठी जबाबदार सेवेकरी आजपासूनच तैनात करण्यात आले आहेत.

शुक्रवारी दिवसभर भगवान पशुपतिनाथ आणि पंचक्रोशीतील विविध धार्मिक स्थळांवर महिला पुरुष सेवेकरी आणि भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केल्याचे दिसून येत आहे. ३०० फूट रुंद आणि ७०० फूट लांब असा भव्य मंडप तर २५ फूट रुंद व ८० फूट लांब असे सोहळ्यास साजेसे व्यासपीठ उभारण्यात आले आहे.

 A magnificent body prepared for the extravagant lingarchan ceremony and  Devotees worshiping Gurumauli Annasaheb More.
International Satsang Ceremony : आंतरराष्ट्रीय सत्संगासााठी सेवेकरी नेपाळला रवाना : चंद्रकांतदादा मोरे

येणाऱ्या बसेस साठी पुरेशी पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. येणाऱ्या सेवेकरी, भाविकांच्या स्वागतासाठी व सोहळा यशस्वी करण्यासाठी नेपाळमधील सेवेकरी तन, मन, धनाने सेवा देत आहेत. आतापर्यंत सेवामार्गाचे देशभर शेकडो मेळावे व आध्यात्मिक सोहळे झाले आहेत. हे सर्व कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध आणि शांततेत झाले आहेत. हा सोहळा सुद्धा या लौकिकास साजेसा असाच होणार असल्याचा विश्वास नितीनभाऊ मोरे यांनी व्यक्त केला आहे.

साडेआठ ते साडेदहा वाजेपर्यंत मुख्य लिंगार्चन आणि ललिता सहस्रनाम पठणाचा कार्यक्रम होईल. साडेदहा वाजता गुरुमाउलींचे व्यासपीठावर आगमन होईल. दीपप्रज्वलन मान्यवर करतील. मान्यवर मनोगत व्यक्त करतील. मान्यवरांमध्ये नेपाळच्या उपराष्ट्रपतींचाही समावेश आहे. यानंतर गुरुमाउली हितगूज करतील. हा सोहळा बारा वाजेपर्यंत चालेल, यानंतर सर्व महाप्रसाद घेऊन परतीच्या प्रवासाला लागतील.

 A magnificent body prepared for the extravagant lingarchan ceremony and  Devotees worshiping Gurumauli Annasaheb More.
International Satsang Ceremony: समर्थ सेवा मार्गाचा नेपाळमध्ये भव्य आंतरराष्ट्रीय सत्संग सोहळा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.