International Women's Day Special: क्रीडा कौशल्‍ये अन्‌ सुरक्षिततेचे कवच.! 18 वर्षांपासून गीतांजली सावळे देताय खो-खो प्रशिक्षण

Nashik News : गीतांजली सावळे व त्‍यांच्‍यासारख्या महिला प्रशिक्षिका मुलींना क्रीडा कौशल्‍ये देताना सोबत सुरक्षिततेचे कवचही उपलब्‍ध करत आहेत.
Gitanjali Sawale Kho Kho Trainer
Gitanjali Sawale Kho Kho Traineresakal
Updated on

नाशिक : वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांमध्ये मुलींचा सहभाग वाढत असून, अगदी स्‍थानिक स्‍तरावरील स्‍पर्धांपासून राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्‍पर्धांमध्ये महिला खेळाडू पदकांची लयलूट करत आहेत. पण या खेळाडूंना घडविण्यासाठी महिला प्रशिक्षकांचा विचार केला, तर आजही ही संख्या तोकडीच आहे. पण गीतांजली सावळे व त्‍यांच्‍यासारख्या महिला प्रशिक्षिका हा कल बदलताना मुलींना क्रीडा कौशल्‍ये देताना सोबत सुरक्षिततेचे कवचही उपलब्‍ध करत आहेत. (International Women Day 2024 Gitanjali Sawale Kho Kho training marathi news)

अठरा वर्षांपासून गीतांजली सावळे या खो- खो प्रशिक्षिका म्‍हणून जबाबदारी सांभाळत आहेत. खेळाडू म्‍हणून राष्ट्रीय स्‍तरापर्यंत मजल मारलेली असल्‍याने त्‍यांना महिला खेळाडूंच्‍या समस्‍यांची जाण होती. तेव्‍हा बहुतांश वेळा पुरुष प्रशिक्षक असतं. त्‍यामुळे खेळाडूंना काही समस्‍यांबाबत मनमोकळे बोलता येत नव्‍हते. ही गोष्ट त्‍यांच्‍या लक्षात होती.

आनंद निकेतन येथे क्रीडा शिक्षिका म्‍हणून काम करताना त्‍यांनी मुला- मुलींच्‍या संघाची बांधणी केली होती. तेव्‍हापासून त्‍यांनी प्रशिक्षणाकडे वळण्याचे ठरविले. त्‍यासाठी त्‍यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस नॅशनल इन्‍स्‍टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स येथून प्रशिक्षक पदाकरिता सहा आठवड्यांचे प्रशिक्षणदेखील यशस्वीरीत्या पूर्ण केले.

व तेव्‍हापासून आजवर गेल्या अठरा वर्षांपासून त्‍या खो-खो प्रशिक्षिका म्‍हणून कार्यरत आहेत. प्रशिक्षक म्‍हणून महिला खेळाडूंना क्रीडा कौशल्‍ये प्रदान करताना त्‍यासोबत त्‍यांच्‍याशी महिला म्‍हणून संवाद साधत त्‍यांना सुरक्षिततेची हमी दिली जात असल्‍याने त्‍याचे सकारात्‍मक परिणाम खेळाडूंच्‍या कामगिरीवरदेखील होत आहेत. (Latest Marathi News)

Gitanjali Sawale Kho Kho Trainer
Women's Day Special : मुक्या प्राण्यांवर जीव ओवाळून टाकणारी खाकीतील ‘मीरा’!

मुलींची राज्‍यस्‍तरावर आघाडी..

गीतांजली सावळे यांच्‍या नेतृत्‍वाखाली प्रशिक्षण घेत असलेला नाशिकच्‍या मुलींचा संघ १८ वर्षाआतील गटात सलग तीन वर्षांपासून दुसऱ्या क्रमांकावर आहे. तसेच १४ वर्षाआतील व खुल्‍या गटात पहिल्‍या आठमध्ये नाशिकला स्‍थान आहे.

"अनेक स्‍पर्धांच्‍या ठिकाणी विशेषतः दुर्गम भागांमध्ये पायाभूत सुविधांचा अभाव असतो. त्‍यामुळे महिला खेळाडूंना वेगळ्या प्रकारच्‍या अडचणींना तोंड द्यावे लागते. महिला प्रशिक्षक म्‍हणून त्‍यांच्‍या समस्‍या समजून घेत, सोडविणे सोपे जाते. परिणामी खेळाडू खेळावर लक्ष केंद्रित करत असल्‍याने त्‍यांची कामगिरी उंचावते. या सुविधा उपलब्‍ध झाल्‍यास व महिला खेळाडूंनी प्रशिक्षकांच्‍या भूमिकेत पुढे आल्‍यास अनेक अडचणी सुटू शकतील."

- गीतांजली सावळे, प्रशिक्षिका, खो-खो.

Gitanjali Sawale Kho Kho Trainer
International Women's Day 2024: महिलांनी शारीरिक समतोल जोपासणे गरजेचे : डॉ. अनिता बांगर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.