International Workers Days : कामगारांच्‍या जीवनावर आधारित रांगोळी; अनोखा उपक्रम

A magnificent rangoli created by Rangsangati Group and City Center Mall
A magnificent rangoli created by Rangsangati Group and City Center Mall esakal
Updated on

Nashik News : कामगार आणि त्‍यांचे जीवन यावर आधारित सुरेख आणि भव्‍य स्वरूपाची रांगोळी उंटवाडी रोड येथील सिटी सेंटर मॉल येथे साकारण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय कामगार दिनाचे औचित्‍य साधताना रंगसंगती ग्रुप आणि सिटी सेंटर मॉल यांच्‍यातर्फे हा अनोखा उपक्रम राबविण्यात आला आहे. (International Workers Day Rangoli based on life of workers nashik news)

कामगार या विषयाशी निगडित ही रांगोळी पारंपारिक रांगोळीपेक्षा वेगळ्या पद्धतीने साकारलेली आहे. या संकल्‍पनेस भौमितिक रचना चित्र पद्धती, ब्लॉक मेथड, पिक्सल रांगोळी आर्ट किंवा स्क्वेअर रांगोळी पद्धत असे संबोधले जाते. रांगोळी पाहताना तुम्हाला कलाप्रेमींना केवळ लहान, लहान चौकोन दिसतील.

रंगांच्या या चौकोनातून रांगोळीचे वैशिष्ट्यपूर्ण रेखाटन केलेले दिसेल. ही रांगोळी शक्यतो उंचीवरून अर्थात पहिल्या, दुसऱ्या मजल्यावरून पाहण्यात खरी मजा आहे. रांगोळीचा आकार हा कामगार दैनंदिनरित्‍या कामावर नेत असलेल्‍या डबाच्‍या आकाराप्रमाणे आहे. त्या डब्यामध्ये विषयाची मांडणी केलेली आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

A magnificent rangoli created by Rangsangati Group and City Center Mall
Market Committee Election Result : बनकरांना बूस्टर डोस, अण्णांचे कदम अडखळले

हे चौकोन काढण्यासाठी स्वहस्ते बनवलेल्या टूल्सचा वापर केला आहे. या रांगोळीचा आकार १८ फूट बाय ३६फूट इतका असून प्रवीण खोटरे, स्वाती गडाख, स्वप्नील आहिरे, आसावरी धर्माधिकारी, सुनीता घोटकर, आदित्य माताडे या सहा कलाकारांनी मिळून ही रांगोळी साकारली आहे. या रांगोळीची जागतिक विक्रम नोंद करण्याचादेखील मानस आहे.

यामध्ये एकूण ५१ हजार चौकोन असतील. शुक्रवारी (ता. २८) ही रांगोळी साकारण्यात आलेली असून, सायंकाळनंतर कलाप्रेमींना पाहाण्यासाठी उपलब्‍ध करून दिलेली आहे. २ मेपर्यंत रांगोळी पाहाण्यासाठी खुली असेल. कलाप्रेमी, नाशिककरांनी ही रांगोळी पाहाण्यासाठी भेट द्यावी, असे आवाहन रंगसंगती ग्रुप आणि सिटी सेंटर मॉल यांच्यातर्फे केले आहे.

A magnificent rangoli created by Rangsangati Group and City Center Mall
PM Modi Rangoli : सटाण्यात साकारली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भव्य रांगोळी; वेधतेय लक्ष

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.