International Yoga Day : सहा हजार परदेशी विद्यार्थ्यांनी गिरविले योगशास्त्राचे धडे;त्र्यंबकेश्वर येथील योगविद्या गुरुकुलचे यश

योग ही भारताने जगाला दिलेली अद्भुत देणगी असून, २१ जून आंतरराष्ट्रीय योग दिन जगभरात साजरा केला जातो. त्र्यंबकेश्वर येथील योगविद्या गुरुकुलमधून सहा हजार परदेशी विद्यार्थ्यांनी योगशास्त्राचे शिक्षण घेऊन परदेशात स्वतःची योगा केंद्रे सुरू केली आहेत.
International Yoga Day
International Yoga Daysakal
Updated on

नाशिक : योग ही भारताने जगाला दिलेली अद्भुत देणगी असून, २१ जून आंतरराष्ट्रीय योग दिन जगभरात साजरा केला जातो. त्र्यंबकेश्वर येथील योगविद्या गुरुकुलमधून सहा हजार परदेशी विद्यार्थ्यांनी योगशास्त्राचे शिक्षण घेऊन परदेशात स्वतःची योगा केंद्रे सुरू केली आहेत. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात २००६ पासून योगशास्त्र अभ्यासक्रम शिकविला जातो. राज्यभरातूनविद्यापीठाच्या योगविषयक शिक्षणक्रमातून १५ हजार योग शिक्षक तयार झाले आहेत.

परदेशी नागरिकांना योगसाधनेविषयी बरेच आकर्षण असल्याने परदेशात योग शिकण्याचे अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. वजन कमी करणे वा वाढविण्यासाठी, चेहऱ्यासाठी फेस योगा, सुंदर दिसण्यासाठी परदेशी नागरिक योग शिकण्याला विशेष प्राधान्य देतात. जिथे विज्ञान-तंत्रज्ञान कमी पडते तिथे पारंपारिक आयुर्वेद, योगाभ्यास उपयोगी येतात, असा अनेकांचा अनुभव आहे. अनेक आजार दूर करण्यात आधुनिक वैद्यकशास्त्र,डॉक्टर अयशस्वी ठरतात तिथे योगशास्त्राने रूग्ण बरे झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे भविष्यात योगशास्त्राकडे संधी म्हणून बघताना परदेशी भाषा आणि योगाशास्त्राचे धडे घेतल्यास भारताबाहेर करियरच्या मुबलक संधी उपलब्ध आहेत.

२१ जून निवडण्यामागे कारण काय?

आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यासाठी २१ जून तारीख निवडण्यामागे विशेष कारण आहे. २१ जून हा वर्षातील सर्वात मोठा दिवस मानला जातो, त्याला ‘उन्हाळी संक्रांत असे म्हणतात. उन्हाळी संक्रांत हा उत्तर गोलार्धातील सर्वात जास्त प्रकाश असलेला दिवस आहे. पृथ्वीचा अक्ष त्याच्या कमाल कोनात सूर्याकडे झुकतो, त्यामुळे दिवस मोठा होतो. २१ जूननंतर सूर्य दक्षिणायनात प्रवेश करतो. योग आणि अध्यात्मासाठी हा दिवस खास मानला जातो. त्यामुळे २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.

दरवर्षी ३ ते ४ हजार विद्यार्थी योग शिक्षक डिप्लोमाला प्रवेश घेतात. स्वामी विवेकानंद, योगी अरविंद यांनी जगभरात योगशास्त्राचा प्रसार केल्यामुळे खासकरून युरोपीय देशांमध्ये त्यात जर्मनीमध्ये योगा इन्स्टिट्यूट सर्वाधिक आहेत. मुक्त विद्यापीठात हिंदी, इंग्रजी, मराठी योगशास्त्राचा अभ्यासक्रम शिकविला जातो. भविष्यात इतर परदेशी भाषांमध्ये हा अभ्यासक्रम शिकविला जाणार आहे.

- डॉ. जयदीप निकम,

आरोग्य शिक्षण शाखेचे संचालक, मुक्त विद्यापीठ

योगसाधनेमध्ये करिअर करण्यासाठी सध्या खूप चांगल्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. शाळा, महाविद्यालये, विद्यापीठ शिवाय सरकारी नोकरी मिळत असल्याने वर्षाला एक हजार शिक्षक गुरुकुलमधून बाहेर पडतात.

-विश्वास मांडलिक, योगाचार्य, योग विद्या गुरुकुल, नाशिक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com