World Record : 4 हजार किलोची भगर खाण्यासाठी तोबा गर्दी!

4000 kg bhagar Making
4000 kg bhagar Makingesakal
Updated on

नाशिक : सलग ५६ तास पदार्थ शिजवून बनविण्याच्या विक्रमासह कुकिंगचे १५ जागतिक विक्रम नावावर असलेले आंतरराष्ट्रीय (International) ख्यातीचे शेफ विष्णू मनोहर यांनी रविवारी (ता. १२)

नाशिकमध्ये तब्बल ४ हजार किलोची भगर शिजविली. (Internationally renowned chef Vishnu Manohar cooked 4000 kg Bhagar on 12 feb nashik news)

विशेषत: विष्णू मनोहर ही भगर कशी बनविणार हे शेकडो नाशिककरांनी पाहिले तर सोशल मीडियावरूनही याचे थेट प्रक्षेपणही लाखोंनी पाहिले. दरम्यान, चविष्ट भगर रुग्णालये, आधाराश्रमांसह सेवा भावी संस्था आणि सुमारे २० हजार नाशिककरांनी चाखली. भगर घेण्यासाठी नाशिककरांच्या अक्षरश: रांगा लागल्या होत्या.

युनेस्कोने २०२३ हे वर्ष मिलेट्स (तृणधान्य) वर्ष म्हणून नुकतेच जाहीर केले आहे. नाशिकची भगर ही भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्ध आहे. नाशिक भगर मिल असोसिएशन व कृषी विभाग यांच्या पुढाकाराने महाराष्ट्र मिलेट्स मिशन यांच्या सहकार्याने रविवारी त्र्यंबक रोडवरील ठक्कर इस्टेट येथे चार हजार किलोची भगर शिजवून ती नाशिककरांना मोफत वाटप करण्यात आली.

आंतरराष्ट्रीय प्रख्यात शेफ विष्णू मनोहर यांनी ही भगर बनविली आणि त्यांच्या नावे १६ जागतिक विक्रमही नोंद झाला. या वेळी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी गंगाथरन डी., मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, आमदार दिलीप बनकर, माजी आमदार अनिल कदम, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांनी प्रत्यक्ष भगर बनविण्याचा आनंद घेतला.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

4000 kg bhagar Making
Metro Neo Project : 3 महिन्यात मेट्रो निओचा नारळ फुटणार; फडणवीस यांचे आश्वासन

तर, या वेळी जिल्हा कृषी अधिकारी विवेक सोनवणे, मोहन वाघ, प्रकाश पाटील यांच्या अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त गणेश परळीकर, उपायुक्त विवेक पाटील, तांबोळी, प्रमोद पाटील या अधिकारी, कर्मचाऱ्यांसह नाशिक भगर मिल असोसिएशनचे अध्यक्ष महेंद्र छोरिया,

पंकज छोरिया, कीर्ती छोरिया, उमेश वैश्‍य, अशोक सांखला, पारस सांखला, पियुष बोरा, अखिल राठी, दीपक राठी, ओमप्रकाश अग्रवाल, अतुल पवार, गणेश ढाकणे, अमित नागसेठीया, जितेंद्र चोरडिया, मोहनलाल चोरडिया यांनी सदरचा उपक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

नागपूरहून विशेष कढई
४ हजार किलो भगर एकाच वेळी शिजविण्यासाठी नागपूर येथून खास कढई आणण्यात आली आहे. या कढईचे वजनच सुमारे दीड हजार किलो होते. १० बाय १० फूट व्यास आणि ५ फूट उंच असून, भगर शिजविण्यासाठी ३ प्रकारचे २२ किलो वजनाचे मोठे चमचेही आणण्यात आले होते.

4000 kg bhagar Making
Nashik News : तब्बल 3 तास संरक्षण जाळीत अडकून पडला वृद्ध!

अशी होती खास रेसिपी
भगर बनविण्यासाठी विष्णू मनोहर यांनी खास रेसिपी तयार केली असून, त्यासाठी भगर ४०० किलो, बटाटा २५० किलो, मीठ ३७ किलो, तेल १२५ किलो, पाणी २७०० लिटर , जिरा १२ किलो, शेंगदाणे १०० किलो, शेंगदाणे कूट १२५ किलो, दही ४०० किलो, ५०किलो, तूप १०० किलो,

दूध १०० लिटर आदी साहित्य वापरून ४ हजार किलो भगर शिजविण्यात आली. शेफ विष्णू मनोहर यांनी सकाळी आठच्या सुमारास भगर बनविण्यास प्रारंभ केला आणि साडेअकराच्या सुमारास चविष्ट भगर शिजवून तयार होती.

रुग्णांपर्यंत पोचली चविष्ट भगर
शहरातील नामको कॅन्सर हॉस्पिटल, आडगाव येथील मविप्रच्या डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय येथील रुग्णांपर्यत गरमागरम भगर पोच झाली. तर, प. सा. नाट्यगृहात सुरू असलेल्या युवा साहित्य संमेलनस्थळीही भगर पोचली. याशिवाय, शहरातील आधाराश्रम आणि अनाथाश्रमातही भगर पोचविण्यात आली.

तर, रॉबिन हुड फाउंडेशनसह काही सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून गरमागरम भगर गरजूंपर्यंत पोचली. तसेच, प्रत्यक्ष घटनास्थळावरून सुमारे १५ ते १७ हजार नाशिककरांनी गरमागरम भगरीचा आस्वाद घेतला. तर बहुतांशी नागरिकांनी रांगा लावून डब्यांमधून भगर घरीही नेली.

4000 kg bhagar Making
Nashik News : 7 महिन्यांत 6 हजार 195 कोटी रुपयांची शेतकऱ्यांना मदत : अनिल बोंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.