50 ते 100 रुपयांत देवारपाडेच्या शेतकऱ्याचा यंत्राविष्कार!

young farmer
young farmeresakal
Updated on

मालेगाव कॅम्प (जि.नाशिक) : उद्योगी तरुण हा कुटुंबाचा आधार असतो. गरज ही नव्या शोधांची जननी असते. सतत नवीन काहीतरी शोधण्याची वृत्ती फायदेशीर ठरते. वडिलांना शेतीत मदत करत देवारपाडे (ता. मालेगाव) येथील युवा शेतकऱ्याने टाकाऊ वस्तूंपासून कपाशी व मकालागवड यंत्र बनविले असून, त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. (invention-of-young-farmer-in-Dewarpade-nashik-marathi-news)

टाकाऊ वस्तूंपासून कपाशी, मकालागवड यंत्र

विशेष म्हणजे अतिशय सहजगत्या शेतकरी यंत्र बनवू शकतात. या यंत्राने कपाशी लागवडीचे काम अगदी सोपे व जलद होते. वेळ, मजूर व पैसे या गोष्टींची बचत होते. हे यंत्र बनविण्याचे मूळ कारण म्हणजे जेव्हा कपाशी लागवड करतात. तेव्हा शेतकऱ्यास वाकावे लागते. यामुळे कपाशी लागवड करताना वाकल्याने पाठदुखी, कंबर, गुडघेदुखीचा खूप मोठा त्रास जाणवतो. हाच त्रास दूर करण्यासाठी यंत्राची निर्मिती कमलेशने केली. प्रत्येक शेतकरी कुटुंबात नळी वगैरे जुजबी साहित्य उपलब्ध असते. याचाच जुगाड करून अगदी ५० ते १०० रुपयांत हे साहित्य बनविता येते, असे कमलेशने सांगितले. कपाशी लागवडीत तरुणाई सहज वेळ देऊन कामास हातभार लावेल, अशी अपेक्षा त्याने व्यक्त केली.

शेतीकामात हातभार

या यंत्राने तूर, भुईमूग, मकालागवडसुद्धा करता येऊ शकते. दोन वर्षांपूर्वी कमलेशने जुन्या सायकलीचा वापर करून पेरणी, कोळपणी व फवारणी करणारे बहुउद्देशीय देशी जुगाड करून यंत्र विकसित केले होते. स्वतः कलासक्त अभिनेता असून, अनेक लघुपटांद्वारे भूमिका साकारल्या आहेत. वडिलांच्या शेतीत मदत करण्यासाठी नवनवीन शोध घेऊन वेगळे करण्यात त्याला आनंद मिळतो.

वजनाला हलके अन् सोपे

या यंत्राला बनविण्यासाठी मला टाकाऊ वस्तू एक-दोन फुटांचा गोल पाइप, कपाशीचे बी टाकण्यासाठी एक पाण्याची रिकामी बॉटल, बॉटल कापून तिला एक-दोन फुटांची वायर लावली आहे. वजनाला हलके हाताळणीयोग्य सहजगत्या बनविता येईल असे यंत्र आहे.

young farmer
बलात्काराच्या गुन्‍ह्यातील निलंबित पोलिस निरीक्षक गजाआड

शेतीचा खर्च व उत्पन्नाचा ताळमेळ बघता जगणे अवघड झाले आहे. अशा वेळी काम करताना कल्पनाशक्ती व शिक्षणाचा योग्य उपयोग वडिलांच्या कामात येतो. -कमलेश घुमरे, कपाशीयंत्र निर्माता, देवारपाडे

young farmer
Nashik : तिसऱ्या लाटेच्या तोंडावर अनलॉक लांबण्याची चिन्हे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.