नाशिक : आदिवासी विकास विभागाच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता दिनेशकुमार बागूल यांच्या काळात झालेल्या संपूर्ण कामांची चौकशी करण्याची मागणी अखिल आदिवासी विकास परिषद युवा राज्याध्यक्ष लकी जाधव यांनी गुरुवारी (ता.१) आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्याकडे केली. यासह विविध मागण्यासंदर्भात निवेदन देत चर्चा केली. (Investigate works of Executive Engineer Dinesh Kumar bagul Bribe Case Nashik Latest Marathi News)
यात कार्यकारी अभियंता बागूल यांच्या कामांच्या चौकशी यासह दिल्ली येथे आदिवासी विद्यार्थ्यांसाठी युपीएससीच्या तयारीसाठी प्रशिक्षणाची व वसतिगृहाची निर्मिती करावी, हरसूल येथील सेंट्रल किचनच्या कामाची पुन्हा नव्याने निविदा प्रक्रिया राबविण्यात यावी, बांधकाम विभागाचे कार्यालय हे आयुक्त, अपर आयुक्त यांच्या अधिकार क्षेत्रात आणले जावे, आदिवासी विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या डीबीटीमध्ये वाढ व्हावी अथवा पुन्हा खानावळ पद्धत सुरु करावी,
मरांग गोमके, जयपालसिंह मुंडा यांचा इतिहास राज्यातील विद्यापीठांमधील अभ्यासक्रमात घेण्यात यावा, विशेष पदभरतीची अंमलबजावणी करावी, आदिवासी कलाकारांना मासिक मानधन देण्यात यावे, कसत असलेल्या गायरान व वनजमिनी आदिवासींच्या नावावर करण्यात याव्यात, ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाची संपूर्ण देशात शासकीय सुट्टी जाहीर करावी,
कसारा घाटाला क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचे तर, भावली धरणाला क्रांतिकारक राया ठाकर यांचे नाव द्यावे, आदिवासी कोट्यातील रिक्त जागांची पदभरती करण्यात यावी, अनुसूचित क्षेत्रातील सर्व विभागातील पेसा पदभरती करण्यात यावी यासह प्रमुख मागण्या मंत्री विजयकुमार गावित यांच्याकडे संघटनेच्यावतीने करण्यात आल्या. या मागण्यांवर सकारात्मक विचार करून निर्णय घेण्याचे आश्वासन यावेळी पदाधिकाऱ्यांना दिले. युवा कार्याध्यक्ष गणेश गवळी, संदीप गवारी, आकाश वसावे आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.