Nashik News : मद्यपी वैद्यकीय अधिकाऱ्यावर कारवाईचा बडगा; कपालेश्वर आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकाऱ्यांची चौकशी

State Women's Commission member Deepika Chavan, medical officer next to her while discussing with a female patient who came to the primary health center.
State Women's Commission member Deepika Chavan, medical officer next to her while discussing with a female patient who came to the primary health center. esakal
Updated on

Nashik News : बागलाण तालुक्यातील कपालेश्वर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मद्यधुंद वैद्यकीय अधिकाऱ्याने प्रसूतीसाठी आलेल्या एका महिलेला दाखल करून न घेता महिलेसह तिच्या वडिलांना हुसकावून लावले. या प्रकाराची जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी गंभीर दखल घेतली.

श्रीमती. मित्तल यांनी सदर प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे यांनी दिले आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील काही वैद्यकीय अधिकारी व्यसनी असून त्यांच्यासंदर्भात वारंवार तक्रारी येत आहे. (Investigation of Kapaleshwar Health Centre Medical Officer nashik news)

त्यामुळे या अधिकाऱ्यांचा अहवाल मागविला असून त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचे श्रीमती. मित्तल यांनी सांगितले.

कपालेश्वर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. वीरेंद्र आवारे यांनी २२ ऑगस्ट रोजी रात्री अकराला प्रसूतीसाठी आलेल्या कल्पना भोये (रा. खडकी ता. कळवण) या महिलेला रुग्णालयात दाखल न करून घेता डांगसौंदाणे ग्रामीण रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. या प्रकारानंतर गावातील ग्रामस्थांनी डॉ. आवारे यांची तातडीने बदलीची मागणी केली आहे.

या घडलेल्या प्रकाराची प्राथमिक माहिती मित्तल यांनी घेत लागलीच चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश आरोग्य विभागास दिले. मुख्य कार्यकारी अधिकारी मित्तल यांच्या आदेशानुसार गुरुवारी (ता.२४) तातडीने डॉ. मोरे संबंधित आरोग्य केंद्रात चौकशीसाठी दाखल होत सर्वच विभागाची झाडाझडती घेतली. तसेच अधिकाऱ्यावर कारवाई बाबतचा शुक्रवारी (ता.२५) अहवाल ते सादर करणार आहेत.

दुसरीकडे जिल्ह्यात व्यसनी वैद्यकीय अधिकारी असून यांच्या कामकाजाबाबत वारंवार तक्रारी येत आहे. या अधिकाऱ्यांमुळे चांगले काम करत असलेल्या वैद्यकीय अधिकारी यांची बदनामी होत आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

State Women's Commission member Deepika Chavan, medical officer next to her while discussing with a female patient who came to the primary health center.
Nashik News : मद्यधुंद अवस्थेतील वैद्यकीय अधिकाऱ्याकडून गर्भवतीची हेळसांड! ग्रामस्थांची कारवाईची मागणी

त्यामुळे वारंवार तक्रारी असलेल्या व्यसनी वैद्यकीय अधिकारी यांचा अहवाल मागविला आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधितांवर निलंबनाची कारवाई केली जाणार असल्याचे श्रीमती. मित्तल यांनी सांगितले. साधारणः जिल्हाभरात असे ५ ते ६ वैद्यकीय अधिकारी असल्याचे सांगितले जात आहे

यावेळी माजी आमदार दिपिका चव्हाण यांनी देखील आरोग्य केंद्र, संबंधित कुटुंब प्रमुख व गावकऱ्यांशी संवाद साधला. तसेच अधिकाऱ्यावर कारवाईसाठी वरिष्ठांशी बोलणार असल्याचे देखील ग्रामस्थ यांना सांगितले.

"कपालेश्वर प्राथमिक आरोग्य केंद्रात झालेला प्रकार दुर्दैवी आहे. माझ्या मतदार संघात असा गैरप्रकार कधी ही खपवून घेतला जाणार नाही. मध्यप्रदेश दौऱ्याहून आल्यानंतर मतदार संघातील आरोग्य यंत्रणेचा आढावा घेण्यात येणार आहे" - आमदार दिलीप बोरसे

"सरकार गरोदर मातांसाठी लाखो रुपये आरोग्य यंत्रणेवर खर्च करत असताना एका जबाबदार वैद्यकीय अधिकारीने असे वागणे गैर आहे. संबंधित महिलेला झालेला त्रास हा गंभीर आहे. या बाबत महिला आयोगाने गंभीर दखल घेतली आहे." - दिपिका चव्हाण, सदस्या राज्य महिला आयोग

State Women's Commission member Deepika Chavan, medical officer next to her while discussing with a female patient who came to the primary health center.
Nashik News : जप वह्यांच्या मंत्रातून साकारले जनार्दन स्वामी! साक्षात बाबाजीच संवाद साधत असल्याचा भाविकांना भास‌

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.