नाशिक : देशातील शेती(agro) दीर्घकाळापासून तोट्यात आहे. कमी जमीन, आधुनिक तंत्रज्ञानाचा अभाव, कर्जाचा डोंगर अन बाजारपेठेच्या हमीचा अभाव अशी कारणे त्यामागील आहेत. अशा कालखंडामध्ये तंत्रज्ञानाचा वापर करुन शेत ते बाजारपेठ अशी साखळी तयार करणाऱ्या स्टार्टअपचे ‘मार्केट''(agro market) सध्या ‘बुम'' आहे. गेल्या चार वर्षांमध्ये देशातील ‘ॲग्रीटेक स्टार्टअप्स''(agro tech startup)मध्ये सहा हजार कोटींहून अधिक गुंतवणूक झाली आहे.
‘ॲग्रीटेक स्टार्टअप्स''मध्ये २०१८ मध्ये साडेसहाशे, २०१९ मध्ये सोळाशे, २०२० मध्ये अकराशे, तर गेल्यावर्षी तीन हजार शंभर कोटींहून अधिक झालेली गुंतवणूक कृषी क्षेत्रासाठी थक्क करणारी आहे. इंटरनेट आणि स्मार्ट फोनसह सरकारी धोरणातील बदलांमुळे स्टार्टअप्समधील गुंतवणुकीसाठी गुंतवणूकदारांमध्ये आवड वाढल्याचे हे चिन्ह मानले जात आहे. शेतकरी, ‘बिझनेस टू बिझनेस'', कृषी बाजारपेठा, ग्रामीण व्यवसाय येथपासून ते ब्रँड विकसित होण्यापर्यंतची मजल ‘ॲग्रीटेक स्टार्टअप्स''ने मारली आहे. तरी देखील अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार देशातील वीस टक्क्यांपेक्षा कमी शेतकऱ्यांपर्यंत ‘ॲग्रीटेक स्टार्टअप्स'' पोचू शकले आहे. दुसरीकडे यावरुन या क्षेत्रात मोठी संधी असल्याचे सकारात्मक स्थिती दिसून येते.
संकेतस्थळांवरील माहितीनुसार देशात ६०० ते ७०० ‘ॲग्रीटेक स्टार्टअप्स'' कृषीमूल्य साखळीच्या विविधस्तरांवर कार्यरत आहेत. त्यात कृत्रीम बुद्धीमत्ता, मशीन लर्निंग, इंटरनेट ऑफ थिंग्ज आदींचा वापर करुन ‘डेटा‘ मोठ्याप्रमाणात संकलित करुन त्याचा वापर कृषी क्षेत्रासाठी केला जात आहे. कापणी ते पुरवठा या साखळीतील अपव्यय अशा प्रणालीच्या माध्यमातून चार टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकला आहे. एवढेच नाही, तर नेहमीच्या तुलनेत वितरण क्षमता एक तृतीयांश किमतीत सक्षम होण्यास मदत झाली आहे. त्याचवेळी शेतकऱ्यांच्या निव्वळ उत्पन्नात २० ते ५० टक्क्यांपर्यंत वाढ ‘ॲग्रीटेक स्टार्टअप्स''ना देशात यश मिळाले आहे.
शाश्वत व्यवसायाची षष्ठपदी
शाश्वत व्यवसायाची षष्ठपदी ‘ॲग्रीटेक स्टार्टअप्स''ने पूर्ण केली आहे. त्यामध्ये विश्वास, पारदर्शकता, तंत्रज्ञान, सहयोग, कार्यक्षमता, आकारमान या घटकांचा समावेश होता. ‘स्टार्टअप’ची षष्ठपदी फार्मर्स प्रोड्युसर कंपन्यांच्या कार्यक्षम कामकाजासाठी उपयुक्त ठरु शकेल, असे मानले जात आहे. देशात शेतकऱ्यांसाठी सहकारी संस्था ही पारंपारिक आणि अलिकडच्या काळातील सरकारी योजनांमधील स्वयंसहाय्यता गट याच्या तुलनेत शाश्वत शेतीसाठी फार्मर्स प्रोड्युसर कंपनी शेतकऱ्यांमध्ये आत्मविश्वास दुणावत तोट्यातील शेतीला उर्जितावस्था आणू शकेल, असे अभ्यासकांचे म्हणणे आहे.
फार्मर्स प्रोड्युसर कंपन्यांमध्ये(farmers producer company) सभासदांच्या व्यतिरिक्त गुंतवणूक करणे शक्य होत नाही. अशा परिस्थितीत कायदेशीर तरतूद करुन फार्मर्स प्रोड्युसर कंपन्यांमधील गुंतवणूक (investment in agro companies)वाढवण्याचा विचार होणे ही काळाची गरज बनली आहे.
- विलास शिंदे (अध्यक्ष, सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनी)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.