Nashik News : IRCTC ‘बजेट हॉटेल्स’ ला नाशिकमध्ये जमीन उपलब्ध करावी; भुजबळांची मागणी
नाशिक : इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनने (आयआरसीटीसी) मागणी केल्याप्रमाणे आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ‘बजेट हॉटेल्स’ साठी जमीन उपलब्ध व्हावी.
माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी या मागणीचे पत्र जिल्हाधिकारी आणि राज्याच्या मुख्य सचिवांना पाठवले आहे. नाशिकच्या पर्यटन वाढीसाठी ही बाब आवश्यक असल्याचेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे. (IRCTC should provide land to Budget Hotels in Nashik Demand for Bhujbal Nashik News)
केंद्र सरकारचा उपक्रम असलेल्या आयआरसीटीसी ही संस्था केटरिंग आणि हॉस्पिटॅलिटी सेवांद्वारे श्रेणी सुधारित करणे, व्यावसायिक बनवणे आणि व्यवस्थापित करणे, देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पर्यटनाला चालना देणे, बजेट हॉटेल्स, विशेष टूर पॅकेजेस यांचा विकास करण्यासाठी काम करते.
हा उपक्रम रेल्वे पर्यटन पोर्टलद्वारे आणि बजेट हॉटेल्स, लक्झरी ट्रेन्स चालवून पर्यटनाला चालना देत आहे. महाराजा एक्सप्रेस, बुद्धिस्ट सर्किट ट्रेन्स आदी आणि आयआरसीटीसीची नवी दिल्ली, रांची, पुरी व कोलकता येथील बजेट हॉटेल्स ही उदाहरणे आहेत. सध्या लखनऊ, खजुराहो आणि केवडिया (गुजरात) येथे हॉटेलचे बांधकाम सुरू आहे, असेही श्री. भुजबळ यांनी म्हटले आहे.
हेही वाचा : भारतीय क्रिकेटची नवी आशा- पृथ्वी शाॅ
कॉर्पोरेशनकडून संपूर्ण देशात ‘पीपीपी‘ तत्त्वावर ‘बजेट हॉटेल्स' तथा आलिशान हॉटेल्स जोडून या व्यवसायाचा विस्तार केला जात आहे. त्यादृष्टीने पर्यटनासाठी महत्वाचे शहर असलेल्या नाशिकमध्ये आयआरसीटीसीकडून बजेट ३ स्टार व ४ स्टार हॉटेलच्या विकासासाठी १०० ते १२५ खोल्यांसाठी योग्य जमीन उपलब्ध करण्याचे प्रयत्न आहेत.
आयआरसीटीसीच्या वित्त संचालकांनी राज्याच्या मुख्य सचिवांना ९ डिसेंबर २०२२ ला नाशिकमध्ये ‘बजेट हॉटेल'साठी जागा उपलब्ध करून देण्याची पत्राद्वारे विनंती केली आहे. नाशिकचे पर्यटनाच्यादृष्टीने महत्व आणि आगामी सिंहस्थ कुंभमेळा लक्षात घेता, आयआरसीटीसीला नाशिकमध्ये बजेट हॉटेल्स तयार करण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे.
या माध्यमातून नाशिकच्या पर्यटनाला अधिक चालना मिळणार असून नाशिकची पर्यटन क्षमता वाढून अर्थकारणाला देखील अधिक गती मिळणार आहे. श्री. भुजबळांनी ही बाब पत्रात स्पष्ट केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.