Nashik News : नामपूर बाजार समितीच्या इमारतीच्या कामकाजात गैरव्यवहार; सभापती कृष्णा भामरे यांचा आरोप

Concept picture of the main administrative building to be constructed in the premises of the market committee at Nampur, the actual working building in the second picture
Concept picture of the main administrative building to be constructed in the premises of the market committee at Nampur, the actual working building in the second pictureesakal
Updated on

Nashik News : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील कोट्यवधी रुपये खर्चून बांधण्यात आलेली मुख्य प्रशासकीय इमारतीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाल्याने इमारतीच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

एका तोतया ठेकेदाराच्या नावाने विद्यमान संचालक मंडळातील माजी सभापतींनी प्रशासकीय इमारतीचे कामकाज केले असून विद्यमान सभापतींनी इमारतीच्या सुमार दर्जाच्या कामकाजाबाबत पणन संचालकांकडे लेखी तक्रार निवेदनाद्वारे केली आहे.

तसेच संबंधित ठेकेदारास सर्व बिले अदा करूनही मुदत संपूनही इमारत बाजार समितीकडे हस्तांतरित न झाल्याने कुलूपबंद आहे.

बाजार समितीच्या विविध कामकाजातील गैरव्यवहाराच्या सुरस कथा दस्तुरखुद्द सभापतींनीच उघड केल्याने पणन संचालक काय कारवाई करतात, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे. (Irregularities in Nampur Bazar Committee building work Speaker Krishna Bhamre allegation Nashik News)

नामपूर बाजार समितीला दरवर्षी कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न मिळत असल्याने बाजार समितीच्या मुख्य आवारात सुमारे १ कोटी ६९ लाख रुपयांच्या विनियोगातून प्रशस्त प्रशासकीय इमारतीचे बांधकाम करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला.

त्यानुसार इमारत बांधकामाच्या शासकीय परवानगीचे सर्व सोपस्कार पार पडल्यानंतर इमारतीच्या बांधकामाचा कार्यारंभ आदेश आर. पी. अहिरे यांना २०१९ मध्ये देण्यात आला. परंतु सदर इमारतीचे कामकाज माजी सभापती आर्किटेक संजय भामरे यांनीच केल्याचे विद्यमान सभापती कृष्णा भामरे यांनी निवेदनात नमूद केले आहे.

त्यानंतर अन्य वाढीव कामे अंदाजपत्रकात दाखवून सुमारे १८ लाख रुपये संबंधित ठेकेदाराला अदा करण्यात आले. तसेच इमारतीच्या फर्निचर कामासाठीही २५ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Concept picture of the main administrative building to be constructed in the premises of the market committee at Nampur, the actual working building in the second picture
NDVS Bank Election: व्यापारी बँक निवडणुकीत 124 अर्ज वैध, 1 अवैध; छाननी वेळी संचालकांमध्ये धक्काबुक्की

"बाजार समितीच्या मुख्य आवारातील प्रशासकीय इमारतीचे बांधकाम इस्टीमेटप्रमाणे झालेले नाही. पणन कायद्यानुसार संचालकांना ठेकेदारी करता येत नसल्याने माजी सभापती संजय भामरे यांनी डमी ठेकेदाराच्या नावाने निकृष्ट दर्जाचे कामकाज केले. संचालकांच्या मासिक बैठकीत मी वेळोवेळी याबाबत विरोध केला आहे. या बाबत पणन संचालकांनी निपक्षपणे चौकशी करून दोषींवर कारवाई करावी."- कृष्णा भामरे, सभापती बाजार समिती, नामपूर

"नामपूर बाजार समितीत सभापतिपदासाठी आवर्तन पद्धत कार्यरत आहे. आवर्तनानुसार त्यांचा कार्यकाळ संपल्याने उर्वरित संचालक मंडळाने त्यांचा राजीनामा मागितला. त्यामुळे नाराज होऊन बाजार समितीच्या विकासकांमांबाबत त्यांनी पणन संचालकांकडे तक्रार केल्याचे समाजमाध्यमातूनच समजले. ज्येष्ठ संचालक या नात्याने त्यांचा आदर आहे. मात्र त्यांचे आरोप चुकीचे आहेत. बाजार समितीच्या विकासासाठी संचालक मंडळ कटिबद्ध आहे."

- संजय भामरे, माजी सभापती, नामपूर बाजार समिती

Concept picture of the main administrative building to be constructed in the premises of the market committee at Nampur, the actual working building in the second picture
Nashik: गोदेतील पाण्याचा पिण्यासाठी वापर करू नका; पाटबंधारेच्या सोमठाणे शाखेतर्फे ग्रामपंचायतींना नोटीसा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.