Nashik News : ईशाची उच्च शिक्षणासाठी पोमोना विद्यापीठात निवड; प्रवेश घेणारी देशभरातून एकमेव विद्यार्थिनी

While congratulating Isha Khairnar, Adv. Nitin Thackeray along with other office bearers.
While congratulating Isha Khairnar, Adv. Nitin Thackeray along with other office bearers. esakal
Updated on

Nashik News : आखतवाडे (ता.बागलाण) येथील ईशा विवेक खैरनार हिची मास्टर ऑफ सायन्स इन बायोटेक्नॉलॉजी ॲण्ड फार्मास्युटिकल सायन्सेस या कोर्ससाठी वेस्टर्न युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेस पोमोना (यूएसए) कॅलिफोर्निया येथे निवड झाली.

या युनिव्हर्सिटीत निवड झालेली ती देशातून एकमेव विद्यार्थिनी असल्याने तिचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. (Isha Khairnar selection in University of Pomona for higher studies)

आखतवाडे (ता.बागलाण) येथील व सध्या नाशिक स्थित ईशा नुकतीच मविप्र संस्थेच्या फार्मसी महाविद्यालयातून बॅचलर ऑफ फार्मसी ही डिग्री प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाली आहे. परदेशी विद्यापीठांमध्ये प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या जीआरई या प्रवेश परीक्षेतून चांगल्या गुणांनी पास होत अनेक अडथळे पार करत तिची या अभ्यासक्रमासाठी पमोना विद्यापीठात निवड झाली आहे.

सदर अभ्यासक्रमाचा कालावधी ७ ऑगस्ट २०२३ ते जुलै २०२५ असा राहणार आहे. निवड प्रक्रियेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्यामुळे तिचा या अभ्यासक्रमासाठी लागणाऱ्या दोन वर्षांची संपूर्ण प्रवेश फी (साधारणतः दोन वर्षांचे ३६ हजार यूएस डॉलर) सूट मिळाली आहे. त्याचबरोबर ईशाला या विद्यापीठाकडून ४८ हजार यूएस डॉलर शिष्यवृत्ती दोन वर्षासाठी मिळणार आहे.

ईशा सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक पुंडलिक खैरनार यांची नात असून तोरंगण (ता. त्रंबकेश्वर) येथील प्राथमिक शिक्षक विवेक खैरनार व दात्याने (ता. निफाड) येथील प्राथमिक शिक्षिका रजनी खैरनार यांची कन्या आहे. अभ्यासासोबतच तिने तलवारबाजी या क्रीडा प्रकारात विद्यापीठ स्तरावर सहभाग देखील घेतला आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

While congratulating Isha Khairnar, Adv. Nitin Thackeray along with other office bearers.
PSI Success Story: इंजिनियर गायत्रीची पोलिस उपनिरिक्षक पदाला गवसणी! अथक परिश्रमाला अखेर यश

या विद्यापीठात निवड प्रक्रिया करताना विद्यार्थ्यांचे सामाजिक कार्यातील योगदान देखील पहिले जाते. ईशा मागील एक वर्षापासून झोपडपट्टीतील विद्यार्थ्यांना शिकविण्याचे देखील काम करीत होती. आंतरराष्ट्रीय स्तरावरील या विद्यापीठात भारतातून ईशा एकमेव असून तिच्या सोबत बांगलादेश, नेपाळ येथील एकेक विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.

ईशाच्या या यशाबद्दल मविप्र संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, संस्थेचे अध्यक्ष डॉ.सुनील ढिकले, उपाध्यक्ष विश्वास मोरे, सभापती बाळासाहेब क्षीरसागर, चिटणीस दिलीप दळवी, उपसभापती देवराम मोगल, नाशिक शहर संचालक ॲड. लक्ष्मणराव लांडगे, ग्रामीण संचालक रमेश आबा पिंगळे, शिक्षणाधिकारी डॉ. अशोक पिंगळे, डॉ. अजित मोरे, फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप डेर्ले, उपप्राचार्य डॉ. मिलिंद वाघ, डॉ.घनश्याम जाधव आदींनी अभिनंदन केले.

अशी होते निवड

परदेशी विद्यापीठात प्रवेशासाठी जीआरई आणि आयईएलटीएस या परीक्षांचे गुण विचारात घेतले जातात. सोबतच पदवीचे चार वर्षांचा सीजीपीए पाहिले जातात. कॉलेजच्या प्राध्यापकांचे अभिप्राय पत्र विचारात घेतले जातात. तुम्हाला सदर डिग्री का करायची याबाबत आपले मत लिहून घेतले जाते. हे सर्व अडथळे पार केल्यानंतर युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स, पमोना या विद्यापीठाच्या ३ प्राध्यापकांनी झूमवर ऑनलाइन मुलाखत घेतली आणि ईशाला प्रवेशासाठी ऑफर दिली.

While congratulating Isha Khairnar, Adv. Nitin Thackeray along with other office bearers.
PSI Success Story: गोंदेच्या जिगरबाज युवकाची थक्क करणारी किमया! फौजदारच्या यशाला मेहनतीची सोनेरी झालर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.