Womens Cricket : 'BCCI'च्या शिबिरासाठी ईश्वरी सावकारची निवड

Ishwari Savkar Selected for BCCI Camp
Ishwari Savkar Selected for BCCI Campesakal
Updated on

नाशिक : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) तर्फे मुलींच्या १९ वर्षांखालील वयोगटासाठी आयोजित राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) च्या राष्ट्रीय शिबिरासाठी ईश्वरी सावकारची निवड झाली आहे. यापूर्वी शर्विन किसवे याची शिबिरात निवड झाली होती. या निवडीमुळे क्रीडाप्रेमींकडून समाधान व्‍यक्‍त केले जाते आहे. (Ishwari Savkar Selected for BCCI Camp Nashik womens cricket News)

माजी कसोटीपटू व्‍ही. व्‍ही. एस. लक्ष्मण (VVS Laxman) प्रमुख असलेल्या एनसीए, बेंगळुरूतर्फे देशभरातील उदयोन्मुख, होतकरू खेळाडूंसाठी १६ मे ते ९ जूनदरम्यान शिबिर होणार आहे. मुलींच्या १९ वर्षांखालील वयोगटात एकूण पाच संघ निवडले गेले आहेत. संघातील ईश्वरी सावकारची राजकोट (Rajkot) येथे होणार असलेल्या शिबीरासाठी निवड झाली आहे. तिच्‍या प्रमाणेच महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या (MCA) आणखी पाच मुलींची निवड या शिबिरासाठी निवड झाली आहे.

Ishwari Savkar Selected for BCCI Camp
Women's Cricket : लक्ष्मणच्या खांद्यावर पडणार मोठी जबाबदारी; रमेश पोवारचं काय?

सलामीवीर ईश्वरी सावकारने १९ वर्षाखालील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना आंध्र विरूद्ध ८६ तर चंदिगड विरूद्ध धडाकेबाज ७३ धावा असे जोरदार फलंदाजीचे प्रदर्शन केल्यामुळे महाराष्ट्राच्या वरिष्ठ महिला क्रिकेट (Maharashtra Womens Senior Cricket Team) संघातदेखील निवड झाली होती. गेल्यावर्षी नोव्हेंबर २०२१ मध्ये जयपुर येथे खेळल्या गेलेल्या १९ वर्षाखालील चॅलेंजर ट्रॉफीच्या स्पर्धेतही महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले आहे. या सगळ्या लक्षणीय कामगिरीच्या जोरावर ईश्वरीची भारतीय क्रिकेट नियामक मंडळातर्फे एप्रिलमध्ये पुदुचेरी येथे आयोजित वरिष्ठ महिला टी-ट्वेंटी सामन्यांच्या स्पर्धेसाठी महाराष्ट्र वरिष्ठ महिला संघाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी सुद्धा निवड झाली होती. या निवडीबद्दल जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष विनोद शहा, सचिव समीर रकटे, संघ प्रशिक्षक व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ईश्वरीचे अभिनंदन करत वाटचालीसाठी शुभेच्‍छा दिल्‍या आहेत.

Ishwari Savkar Selected for BCCI Camp
Cricket : महिला T-20 स्‍पर्धेत मायाची भेदक गोलंदाजी; टिपले 4 बळी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.