Nashik ISKCON Temple : आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघातर्फे (इस्कॉन) जन्माष्टमीनिमित्त मंदिरात २४ तास अखंड हरिनाम कीर्तन घेण्यात आले. सायंकाळी एक हजार भाविकांनी श्री राधा कृष्णाच्या विग्रहांचा पंचामृताने अभिषेक केला.
रात्री बाराला भगवान श्रीकृष्ण यांना महाआरती व महाभोग अर्पण करण्यात आला. सायंकाळी १००८ पदार्थांचा नैवेद्य दाखविण्यात आला. (iskcon temple 1008 items were offered to lord krishna nashik news)
जन्माष्टमीनिमित्त इस्कॉन मंदिराची, श्री राधा कृष्णाच्या विग्रहांची सुंदर सजावट करण्यात आली.पहाटे पाचला मंगल आरतीपासून महोत्सवाला सुरवात झाली. हरे कृष्ण महामंत्र जप, दर्शन आरती, श्रीमद भागवत प्रवचन झाले. श्रीकृष्णाच्या विविध लीला प्रदर्शित करणारी लघु नाट्य, दिवसभर कीर्तन, भजनाचे विविध कार्यक्रम झाले.
चैतन्यचरण प्रभू जन्माष्टमीनिमित्त कथा करण्यासाठी आले होते. "गोपी गीत व त्यांची भगवान श्री कृष्णाना प्रकट होण्यासाठी प्रार्थना" या विषयावर सहा दिवस त्यांनी प्रवचन केले.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
"जन्माष्टमीला भगवान श्रीकृष्णाना आपण प्रार्थनेनद्वारे आपल्या हृदयात देखील प्रकट करू शकतो, असे चैतन्य चरण प्रभुंनी श्रीमद भागवत प्रवचनात सांगितले. २५ हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
जन्माष्टमी महोत्सवाच्या यशस्वितेसाठी मंदिराचे अध्यक्ष कृष्णधन प्रभू , उत्सव समिती प्रमुख सत्यराज प्रभू, अच्युत प्राण प्रभू, सहस्त्राशिर्ष प्रभू, गोपालानंद प्रभू, नृसिंह कृपा प्रभू, सार्वभौमकृष्ण प्रभू, मारुतीप्राण प्रभू, अक्षय एडके, सुमेध पवार, नादिया कुमारदास, दिवाकर माताजी, अंतरंगा शक्तीदेवी दासी, तुलसीसेविका माताजी, प्रिया गोरे माताजी, भक्तांनी प्रयत्न केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.