Nashik News : ‘इसोला’ कार्यक्रमांनी उलगडले आदिवासींचे जीवन; देवतांचे बनवले मुखवटे

Isola programs revealed lives of tribals nashik news
Isola programs revealed lives of tribals nashik newsesakal
Updated on

Nashik News : अनादी काळापासून निसर्ग आणि मानवी जीवनाची सुंदर सांगड घालणाऱ्या आदिवासी बांधवांच्या जीवनाकडून अनेक गोष्टी शिकून आत्मसात करण्याची गरज असल्याचा सूर ‘इसोला’ च्या कार्यक्रमांमधून व्यक्त झाला. (Isola programs revealed lives of tribals nashik news)

जागतिक लँडस्केप आर्किटेक्चर महिना साजरा करण्यासाठी इंडियन सोसायटी ऑफ लँडस्केप आर्किटेक्ट्स (इसोला) या संस्थेच्या महाराष्ट्र चॅप्टरने विविध कार्यक्रम घेतले. त्याचा दोन दिवसीय समारोप 'रीडिंग लँडस्केप थ्रू ट्रायबल विजडम' या कार्यक्रमाने झाला. वैराज कलादालनात हा कार्यक्रम झाला.

लँडस्केप आर्किटेक्चर अर्थात भूदृश्य वास्तूकला, ज्यात निसर्ग आणि मानवी उपक्रम यांना एकमेकांशी जोडण्याचे काम खुबीने केले जाते. ही गोष्ट सामान्य लोकांपर्यंत पोचवण्यासाठी चार वर्षांपासून ‘इसोला’ चा महाराष्ट्र चॅप्टर कार्यरत आहे. कला, पर्यावरण आणि पर्यावरणाबद्दल समाजात जागरूकता आणण्यासाठी विविध कार्यक्रम होतात.

आदिवासी बांधव निसर्गाशी थेट जोडलेले असतात. त्यामुळे अनेकदा वारली, मधुबनी, कलमकारी अशा वेगवेगळ्या कला शहरी लोक शिकतात.

मात्र शिकून रेखाटलेली चित्रे आणि आदिवासींनी काढलेली चित्रे यात नेहमी फरक दिसतो. थेट चित्रण अभ्यासक कल्याणी मुजुमदार यांनी दाखवले. आदिवासींच्या कला निसर्गाशी जोडल्या आहेत. त्यामुळेच सूर्य, चंद्र, प्राणी, पक्षी आदींचे चित्रण या कलांमध्ये दिसून येते.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Isola programs revealed lives of tribals nashik news
Smart City Work Extension : कामे पूर्ण करण्यासाठी स्मार्टसिटी कंपनीला मुदतवाढ

या कला म्हणजे त्यांची ओळख असून जीवनाचा अविभाज्य भाग असल्याचे त्यांनी सांगितले. दोन दिवसीय कार्यक्रमामध्ये पहिल्या दिवशी ‘कला आणि सामुदायिक जीवन’ या विषयावर मुजुमदारांचे व्याख्यान संपन्न झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या.

कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात संगीतकार प्राची वैद्य (दुबले) यांनी उपस्थितांना आदिवासी संगीताची सफर घडविली. उपमुखम, बोहाडा आणि द तारपा प्लेअर या तीन माहितीपटांचे सादरीकरण झाले.

कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी आदिवासी जीवन अगदी जवळून बघितले. आदिवासी जनतेशी संवाद साधला. त्यासाठी राम खिंडजवळील जव्हारच्या आदिवासी वस्तीला भेट दिली. इथे आदिवासींची घरे, वाद्ये, कला आदी गोष्टी जाणून घेतल्या.

सोबत आदिवासी लोककलेतील मुख्य आकर्षण असलेले हस्तनिर्मित मुखवटे कसे बनवतात हे समजून घेतले. पुढे परतीच्या प्रवासात शिल्पकार श्रेयस गर्गे यांच्या स्टुडिओमध्ये देवतांचे मुखवटे शाडूच्या मातीमधून बनवण्याचा आनंद लुटला.

Isola programs revealed lives of tribals nashik news
Nashik Rain Alert : आजपासून शनिवारपर्यंत हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.