Nashik: वावी येथील ट्रामा केअर सेंटरचा प्रश्न मार्गी लागणार; आमदार सत्यजित तांबे यांच्या मागणीला यश

नागपूर अधिवेशनात आरोग्यमंत्र्यांकडून सकारात्मक निर्णय होणार
mla satyajeet tambe
mla satyajeet tambeesakal
Updated on

सिन्नर : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत कार्यान्वित करण्यात आलेल्या मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गाच्या शिर्डी ते भरविर (इगतपुरी) दरम्यानच्या टप्प्यात तसेच सिन्नर-शिर्डी राष्ट्रीय महामार्गावरील अपघातग्रस्तांना तातडीची उपचार सुविधा मिळण्यासाठी सिन्नर तालुक्यातील वावी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला ड्रामा केअर सेंटरचा दर्जा देऊन ते विकसित करावे.

अशी मागणी विधान परिषद सदस्य आमदार सत्यजित तांबे यांनी सातत्याने केली आहे. नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान ही मागणी आमदार तांबे यांनी पुन्हा उपस्थित केल्यानंतर आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी उच्चस्तरीय अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

अधिवेशन काळातच ट्रामा केअर सेंटरबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे आरोग्यमंत्र्यांकडून स्पष्ट करण्यात आले. (Issue of trama care center at Vavi to be resolved Success to MLA Satyajeet Tambe demand Nashik)

नाशिक जिल्ह्यातील वावी येथे समृद्धी महामार्ग व सिन्नर शिर्डी राष्ट्रीय महामार्ग या दरम्यान वावी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या प्रशस्त जागेत ट्रामा केअर सेंटरची गरज आमदार तांबे यांनी गेल्या पावसाळी अधिवेशनात मांडली होती.

त्यानंतर त्यांनी आरोग्य विभागाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला आहे. नागपूर अधिवेशनात देखील त्यांनी वावीसह संगमनेर तालुक्यातील डोळासने येथे ट्रामा केअर सेंटर कार्यान्वित करण्याची आग्रही मागणी केली.

आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी यासंदर्भात सरकार सकारात्मक असल्याचे सांगितले. आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आमदार तांबे यांच्या मागणीतील तथ्य आरोग्यमंत्र्यांनी तपासले.

आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवांना जागेबाबत पडताळणी करून प्रस्ताव सादर करण्याचे आदेश आरोग्यमंत्र्यांनी दिले आहेत. राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे अप्पर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी बैठकीला उपस्थित होते.

mla satyajeet tambe
Old Buildings : मुंबईतील मोडकळीस आलेल्या इमारतींच्या दुरुस्तीसाठी मार्ग काढणार - उपमुख्यमंत्री अजित पवार

अधिवेशन काळातच सिन्नर तालुक्यातील वावी व संगमनेर मधील डोळासने येथे ट्रामा केअर सेंटर उभारण्याबाबत निर्णय घेतला जाईल असे आश्वासन आरोग्यमंत्र्यांनी दिले आहे.

त्यामुळे आमदार तांबे यांच्या मागणीनुसार सिन्नर आणि संगमनेर तालुक्यात नवीन ट्रामा केअर सेंटर सुरू झाल्यास त्याचा फायदा नाशिक-पुणे महामार्ग, नाशिक-शिर्डी महामार्ग व समृद्धी महामार्गावरील अपघात ग्रस्त तसेच परिसरातील सर्वसामान्य जनतेला होणार आहे.

वावी येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची सुमारे पाच एकर जागा आहे या जागेत ट्रामा केअर सेंटर सुरू झाल्यास सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील जनतेची आरोग्य विषयक मोठी गरज पूर्ण होईल.

आज वावी परिसरातील नागरिकांना सिन्नर, नाशिक, शिर्डी, प्रवरानगर, संगमनेर या ठिकाणी सरकारी व खाजगी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी जावे लागते. स्थानिक पातळीवर अत्यावश्यक सुविधा मिळाल्यास रुग्णांना फायदा होईल.

भविष्याचा वेध घेतल्यास वावी परिसरात सुरत चेन्नई ग्रीन फिल्ड महामार्ग समृद्धी महामार्गाला छेदून जाणार आहे.

रस्ते विकास महामंडळाकडून समृद्धी महामार्गाच्या दुतर्फा विशेष उद्योग क्षेत्राची घोषणा करण्यात आली आहे. ट्रामा केअर सेंटरचा फायदा या प्रकल्पांना देखील होईल.

mla satyajeet tambe
Mumbai News : मुंबईतील या भागातील जलवाहिन्या बदलणार; पालिका करणार १3 कोटी रुपये खर्च

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.