Nashik News: जगदगुरू जनार्दन स्वामी महाराजांचा जगाच्या कल्याणासाठी अवतार; उत्तराधिकारी शांतिगिरी महाराज

जगदगुरू जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांचा ३४ वा पुण्यतिथी सोहळा उत्तराधिकारी स्वामी शांतिगिरी महाराज यांच्या प्रेरणेने व प्रमुख उपस्थितीत शहरात तपोवनात आठवडाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करत मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
Swami Shantigiriji Maharaj
Swami Shantigiriji Maharajesakal
Updated on

नाशिक : ‘ज्याचा गुरूचरणी निस्सीम भाव, त्याचे मनोरथ पूरवी देव’ तसेच ‘निष्कामता निजदृष्टी अनंतपुण्यकोट्यानुकोटी रोकड्या लाभती पाठोवाठीं तैं होय भेटी हरिप्रियांची’ या भागवत ओव्यांचा अर्थ नीट समजून घ्या. जन्माचे ते मूळ पाहिले शोधून दुःखाची कारण जन्म घ्यावा.

मनुष्याचे जन्माला येण्याचे हे एकच कारण आहे. तसे देवाला जन्माला येण्याचे तीन कारणे आहेत. ते म्हणजे साधूंचे रक्षण, दुष्टांचा नाश आणि धर्माची स्थापना, या तीन कारणांसाठी देवाचा अवतार होतो.

वाढावया सुख, भक्ती, भाव, धर्म कुळाचार, नाम विठोबाचे या सहा कारणांसाठी संतांचा जन्म होत असतो. याचप्रमाणे निष्काम कर्मयोगी जगदगुरू जनार्दन स्वामी महाराज यांनी देखील जगाच्या कल्याणासाठी अवतार घेतला.

बाबाजींनी शेवटच्या श्वासापर्यंत निष्काम कर्मयोग साधत जनकल्याण केले, असे प्रतिपादन उत्तराधिकारी श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज यांनी रविवारी (ता. २४) केले. (Jagadguru Janardhan Swami Maharaj Avatar for World Welfare Successor Shantigiri Maharaj Nashik News)

जगदगुरू जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांचा ३४ वा पुण्यतिथी सोहळा उत्तराधिकारी स्वामी शांतिगिरी महाराज यांच्या प्रेरणेने व प्रमुख उपस्थितीत शहरात तपोवनात आठवडाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करत मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

या सोहळ्यादरम्यान महाजपानुष्ठान, १०८ कुंडात्मक कार्यसिद्धी महायज्ञ, अखंड नंदादीप, हस्तलिखित नामजप, भागवत पारायण, नामसंकीर्तन, अभिषेक श्रमदान, प्रवचन, सत्संग याबरोबरच रोज पहाटे ब्रह्ममुहूर्तावर नित्यनियम विधी, ध्यान, प्राणायाम, महाआरती आदी भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

या सोहळ्याची सांगता आज तपोवन येथे विविध क्षेत्रांतील मान्यवर व साधू-संत-ब्राह्मण-अतिथी यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आली.

Swami Shantigiriji Maharaj
Nashik Shivsena News: शिवसेनेच्या बैठकीत अधिवेशनाचे नियोजन; एक्स्प्रेस इन हॉटेलमध्ये पदाधिकाऱ्यांची चर्चा

कार्यक्रमाच्या सांगतेप्रसंगी पहाटे नित्यनियम विधी, परमपूज्य बाबाजींच्या पादुकांचा अभिषेक, पालखी मिरवणूक, संत, ब्राह्मण व अतिथी पूजन करण्यात आले.

यावेळी व्यासपीठावर काशी येथील महामंडलेश्वर श्री श्री १००८ भवानीनंदन यतीजी महाराज, जम्मू-काश्मीर येथील महामंडलेश्वर दिव्यानंद सरस्वती महाराज, श्री १०८ महंत स्वामी सेवागिरीजी महाराज, स्वामी लक्ष्मणगिरीजी महाराज यांसह आश्रमिय संत, ब्रह्मचारी, तसेच छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संदीपान भुमरे, नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे, त्यांच्या पत्नी अनिताताई भुसे, आध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तुषार भोसले,

वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे, नाशिकच्या आमदार सरोज आहिरे, उत्तर प्रदेशचे माजी आमदार संतोष यादव, रामराज्य युवा यात्रेचे प्रमुख प्रदोष चव्हाणके यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर संत उपस्थित होते.

Swami Shantigiriji Maharaj
Nashik News: दत्तगुरूंची झोळी मानवी दुःख स्वीकारण्यासाठी; गुरुमाउलींचे प्रतिपादन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.