Nashik News : जगन्नाथ पुरीप्रमाणेच आता नाशिकमध्येही रथयात्रा! महंत भक्तीचरणदास

Jagannath Puri Rath Yatra
Jagannath Puri Rath Yatraesakal
Updated on

Nashik News : जुन्या आडगाव नाक्यावरील पंचमुखी हनुमान मंदिर ट्रस्टच्या जिर्णोद्धारानंतर मंदिरात भगवान जगन्नाथ, बलभद्र व सुभद्रा यांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे.

जगप्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रेच्या पार्श्‍वभूमीवर यंदापासून नाशिकमध्येही भव्य रथयात्रा काढण्यात येणार असल्याची माहिती ट्रस्टचे प्रमुख महंत भक्तीचरण दास यांनी दिली. (Jagannath Puri Rath Yatra in Nashik Mahant Bhakticharandas Nashik News)

येत्या २० जूनला शाही मार्गावरून काढण्यात येणाऱ्या या रथयात्रेत सकल हिंदू समाज, पंचमुखी हनुमान मंदिर ट्रस्ट व श्रीराम जन्मोत्सव समितीचा सहभाग असेल. या रथाची अंबड येथे बांधणीही सुरू झाली आहे. हा रथ १४ फुट उंच, बारा फुट लांब व सहा फुट रूंद असणार आहे.

आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षात जगन्नाथ पुरी येथे भव्य रथोत्सव साजरा होतो. हा रथ ओढण्यासाठी जगभरातील भाविक श्रद्धेने तेथे जमा होतात. नाशिकमध्ये जुन्या आडगाव नाक्यावरील पंचमुखी हनुमान मंदिरापासून रथोत्सव सुरू होईल.

गणेशवाडी, मेन रोड, रविवार कारंजा, मालेगाव स्टॅन्ड, पंचवटी कारंजामार्गे रथोत्सव पुन्हा पंचमुखी मंदिराजवळ आल्यावर समारोप होईल. रथयात्रेत सहभागी भाविकांसह रथमार्गाच्या नियोजनाबाबत एक बैठक नुकतीच पंचमुखी हनुमान मंदिरात झाली. त्यावेळी रथोत्सव यशस्वी करण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Jagannath Puri Rath Yatra
Success Story: तमाशातील वगनाट्याने घडवले ऋषीकेशचे आयुष्य! ऋषीकेश व अनिकेतचा प्रेरणादायी संघर्ष

भाविकांना रथ ओढण्याची संधी

जगन्नाथ पुरीच्या रथोत्सवात रथ ओढल्यास सर्व पापांचा नाश होऊन जगन्नाथाचे आशिर्वाद मिळतात, अशी आख्यायिका आहे. मात्र त्यासाठी ओडिशा राज्यात जाणे अनेक भाविकांना शक्य नसते. त्याचाच विचार करून नाशिकमध्ये यंदापासून रथोत्सव साजरा करण्यात येणार असल्याचे श्री. भक्तीचरणदास यांनी सांगितले.

असा असेल रथ

* उंची- १४ फूट

* लांबी- १२ फूट

* रुंदी- ६ फुट.

निर्मितीसाठी : सागवान लाकूड व लोखंडाचा वापर

Jagannath Puri Rath Yatra
Success Story : अपयशाला न जुमानणारी तेजेंद्रची जिद्द; अखेरच्या प्रयत्नात पोलिस होण्याचे स्वप्न साकार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.