Jagannath Rathotsav: जगन्नाथ रथयात्रेत हजारो भाविकांची मांदियाळी! ठिकठिकाणी सडा रांगोळीने स्वागत

Jagannath Rathotsav Nashik
Jagannath Rathotsav Nashikesakal
Updated on

Jagannath Rathotsav : ‘जगन्नाथ भगवान की जय’ चा नारा देत नाशिकमध्ये प्रथमच आयोजित भगवान जगन्नाथ रथयात्रेत हजारो भाविकांनी गर्दी केली होती.

जुन्या आडगाव नाक्यावरील श्री पंचमुखी हनुमान मंदिरासमोर श्री लक्ष्मीनारायण मंदिराचे महंत रामस्नेहीदास महाराज, महंत भक्तिचरणदास महाराज, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते विधिवत पूजन झाल्यानंतर रथोत्सवास प्रारंभ झाला. (Jagannath Rathotsav Thousands of devotees gather in Jagannath Rath Yatra Welcome with rangoli nashik)

प्रभू रामासह हनुमान व विविध देव- देवतांच्या वेशभूषा रथोत्सवाचे आकर्षण ठरले.
प्रभू रामासह हनुमान व विविध देव- देवतांच्या वेशभूषा रथोत्सवाचे आकर्षण ठरले.esakal
esakal

रथोत्सवास प्रारंभ होण्यापूर्वी सकाळी श्री पंचमुखी हनुमान मंदिराचे महंत भक्तिचरणदास महाराज यांनी साधूसंत व मान्यवरांचे स्वागत केले. त्यानंतर निमाचे अध्यक्ष, उद्योजक धनंजय बेळे व प्रेरणा बेळे यांच्या हस्ते रथाचे विधिवत पूजन करण्यात आले.

रथोत्सवात महंत कौशल्यदास महाराज, महंत रामदास महाराज, फलहारी महाराज, महंत नृसिंहचार्य महाराज, महंत बालकदास महाराज, रामतीर्थ महाराज आदींसह विविध संस्थांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

प्रभू रामासह हनुमान व विविध देव- देवतांच्या वेशभूषा रथोत्सवाचे आकर्षण ठरले. महिलांनीही फुगडीचा आस्वाद घेत सहभाग घेतला. रथ ओढण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. ठिकठिकाणी रथाचे पूजन व स्वागत करण्यात आले.

सडारांगोळीने रथाचे स्वागत करण्यात आले. अनेक ठिकाणी फुलांची उधळण करत रथाचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी आमदार डॉ. राहुल ढिकले, सीमा हिरे, प्रा. देवयानी फरांदे, बाळासाहेब सानप, विनायक पांडे, दशरथ पाटील, रुची कुंभारकर, राजेंद्र महाले, महेंद्र आव्हाड,

रामसिंग बावरी, शांताराम दुसाने, फौजी महाराज सूर्यवंशी, त्र्यंबक गायकवाड , नंदू कहार, सचिन डोंगरे, विनोद थोरात, सचिन लाटे, मनीष गोसावी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर व भाविक उपस्थित होते. स्वामी रामतीर्थ महाराज यांनी प्रथम रथाचे स्वागत केले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Jagannath Rathotsav Nashik
Jagannath Temple : भारतीय वंशाच्या अब्जाधीशाकडून २५० कोटी दान! ब्रिटनमध्ये बांधलं जाणारं पहिलं जगन्नाथ मंदिर
esakal
esakal

शरद बोडके, सोनाली बोडके, महेश अग्रवाल, विनायक खैरे, गणेश बर्वे, राहुल बर्वे, मनोज चांडक, भगवंत पाठक, मामा राजवाडे आणि नरहरी उगलमुगले, श्री काळाराम मंदिर येथे विश्‍वस्त मंडळातर्फे रथाचे पूजन करण्यात आले.

गोरेराम मंदिर येथे महंत राजाराम महाराज यांनी पूजन केले. नेहरू चौक येथे बाळासाहेब देशपांडे यांनी रथाचे स्वागत बँड पथकाद्वारे केले.

तिन्ही आमदारांनी ओढला रथ

या वेळी राहुल ढिकले, सीमा हिरे, देवयानी फरांदे या तिघा आमदारांनी रथ ओढला अन् भगवान जगन्नाथ यांच्याकडे आशीर्वाद मागितला.

Jagannath Rathotsav Nashik
Jagannath Rath Yatra 2023 : जगन्नाथ यात्रेतील मूर्तीरूपी प्रतिमा आजही का 'अर्धवट'? जाणून घ्या कारण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.