Nashik Lok Sabha Election : जय बाबाजी भक्त परिवार शांतिगिरीजी महाराजांना लोकसभा निवडणुकीत उतरविणार

लोकसभा निवडणुकीत उतरविणार असल्याची घोषणा जय बाबाजी भक्त परिवाराच्या बैठकीत सर्वानुमते करण्यात आले असल्याची माहिती भक्त परिवाराचे प्रवक्ते विष्णू महाराज यांनी दिली.
Shantigiriji Maharaj
Shantigiriji Maharajesakal
Updated on

नाशिक : जय बाबाजी भक्त परिवार आगामी लोकसभा निवडणुकीत सात मतदार संघात सक्रिय सहभागी होणार असून भक्त परिवाराचे प्रमुख अनंत विभूषित श्री.श्री. १००८ महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज यांना देशभक्तीसाठी, राजकारणाच्या शुद्धीकरणासाठी नाशिक लोकसभा निवडणुकीत उतरविणार असल्याची घोषणा जय बाबाजी भक्त परिवाराच्या बैठकीत सर्वानुमते करण्यात आले असल्याची माहिती भक्त परिवाराचे प्रवक्ते विष्णू महाराज यांनी दिली. (Jai Babaji devotee family will field Shantigiri Ji Maharaj in Lok Sabha elections nashik news)

सध्याचे राजकारण पहाता संतांच्या खांद्यावर राष्ट्रनिर्मीतीची जबाबदारी देणे गरजेचे झाले आहे. या विज्ञान युगातही आपली भारतीय संस्कृती किती फायदेशीर आहे. आणि तिचं अनुकरण परदेशातील नागरिक कुतुहलाने करत आहे हे काही वर्षांपासून आपण बघतो. राजकारण असो किंवा समाजकारण यात निस्वार्थ-त्याग-वैराग्यता यांचा थेट हस्तक्षेप हे याचं मुख्य कारण आहे. येत्या काही दिवसांत २०२४ ची निवडणूकीचा रणसंग्राम भरणार आहे. राजकीय नेते लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारीला लागले आहेत.

आजचे राजकारण कंटाळवाणे वाटत असतांना राजकारणाच्या शुद्धीकरणाची एक आनंदाची बातमी समाजाला देण्यासाठी राज्यभरातील जय बाबाजी भक्त परिवाराच्या झालेल्या बैठकीत निष्काम कर्मयोगी जगदगुरू जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज धर्मपीठाचे पिठाधिश्वर अनंत विभूषित श्री.श्री.१००८ महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरीजी महाराज यांना नाशिक लोकसभा निवडणुकीत उतरविण्याचा निर्णय सर्वानुमते घेतला आहे.

बाबाजींना प्रचंड मताधिक्याने निवडून आणण्यासाठी भक्त परिवार सरसावला असून राज्यभरातील भाविक प्रचार करण्यासाठी नाशिकला दाखल होणार आहे. भक्त परीवाराच्या आग्रहाखातर व काळाची गरज म्हणून भक्त परिवाराने महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज यांना नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याचा निर्णय घेतला आहे.

Shantigiriji Maharaj
Nashik Lok Sabha Elections : लोकसभा निवडणूक तयारीसाठी फेब्रुवारी महत्त्वाचा : उपायुक्त रमेश काळे

जय बाबाजी भक्त परिवार छत्रपती संभाजी नगर,धुळे,जळगांव,जालना दिंडोरी,अहिल्या देवी नगर आदी सात लोकसभा मतदार संघातील निवडणुकीत देखील निस्वार्थी व देशभक्त उमेदवारांना निवडून आणण्यासाठी सक्रिय सहभागी होणार आहे. निवडणुकीसाठी भक्त परिवार नियोजनबद्धरित्या प्रचार कार्याच्या कामाला देखील लागला आहे.

खरं तर बाबाजींची ही उमेदवारी राजकारणाला कलाटणी देणारी ठरणार आहे. कारण दरवर्षी एखादा मंत्री जे काम करु शकत नाही असे दर्जेदार समाजहिताचे,धर्महिताचे, देशहिताचे कार्य महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज दरवर्षी कुठलीही सत्ता आणि पद नसतांनाही नित्य करत आहे.

सुसंस्कारित समाज घडवीण्याचे कार्य करण्याबरोबरच आजचे बालक उद्याचे राष्ट्रचालक यादृष्टीने बालसंस्कार,व्यसमुक्त समाज व महिला सक्षमीकरण यासाठी परिश्रमपूर्वक भरीव कार्य सुरू आहे. सत्तेचं बळ मिळाल्यास महाराज अशक्य गोष्टी देखील शक्य करून दाखवतील हे मात्र नक्की. आजपर्यंतचा इतिहास आहे की या भारतभुमिच्या सर्व तत्वांचं रक्षण हे संतांनीच केले आहे.

महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने चिखल झालेल्या राजकारणात पुन्हा देव-देश-धर्म हिताच्या कार्याचा सुगंध दरवळेल हे मात्र नक्की. पत्रकार परिषदे प्रसंगी स्वामी परमेश्वरानंदगिरीजी महाराज,रामानंदजी महाराज,निवृत्तीभाऊ कंडेकर,बाळासाहेब गामने,अरुण पवार,राजाराम पानगव्हाणे,रामराव डेरे,राजेंद्र पवार यांसह आश्रमिय संत व जय बाबाजी भक्त परिवाराचे सदस्य उपास्थित होते.

Shantigiriji Maharaj
Nashik Lok Sabha Election : मतदारांत 4 लाख 87 हजारांनी वाढ! अंतिम मतदार यादी जाहीर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.