सिन्नर (जि. नाशिक) : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराज यांच्या 108 व्या जयंती उत्सवानिमित्त व अंजनेरी येथील श्री हनुमान जन्मस्थानाचा विकास व्हावा यासाठी जय बाबाजी भक्त परिवाराच्यावतीने महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली एकाच दिवशी एका तासात पाच लाख झाडे लावण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
येत्या सोमवारी दि.22 सकाळी आठ ते नऊ या वेळेत संपूर्ण राज्यात एकाच वेळी वृक्षारोपण केले जाणार आहे. उपक्रमाचा राज्यस्तरीय शुभारंभ आज (दि 20) सिन्नर येथून महामंडलेश्वर शांतिगिरी महाराज यांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात येणार असल्याची माहिती जय बाबाजी भक्त परिवाराकडून देण्यात आली. (Jai Babaji family resolve to plant 5 lakh trees in one hour Nashik latest marathi news)
वृक्ष संवर्धनासारख्या राष्ट्रीय उपक्रमात जय बाबाजी परिवाराने यापूर्वी देखील योगदान दिले आहे. भारत देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असून राष्ट्रसंत जनार्दन स्वामी यांचे यंदा 108 वे जयंती वर्ष आहे. या शिवाय श्री हनुमान जन्म स्थानाचा विकास व्हावा ही जय बाबाजी परिवाराची पूर्वीपासून मागणी आहे.
या तीनही गोष्टींचे स्मरण राहावे यासाठी येत्या सोमवारी दि. 22 ऑगस्ट रोजी संपूर्ण राज्यभर एकाच वेळी 'एक तास वृक्षारोपण' हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. या अंतर्गत सुमारे पाच लाख झाडांची लागवड करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
जय बाबाजी भक्त परिवाराच्यावतीने यासाठी गावोगावी जनजागृती करण्यात असून प्रत्येक कुटुंबाने किमान दोन झाडे आपल्या अंगणात, घराच्या शेजारी अथवा शेतात लावावीत व त्यांचे संगोपन करावे असे आवाहन महामंडलेश्वर शांतिगिरी महाराज यांनी केले आहे.
वृक्षारोपण अभियानाच्या या राज्यस्तरीय मोहिमेचा शुभारंभ शनिवारी सकाळी आठ वाजता सिन्नर येथून करण्यात येणार आहे. अभियानाच्या पार्श्वभूमीवर महामंडलेश्वर शांतिगिरी महाराज सिन्नर येथे येणार असून त्यानिमित्त वावी वेशीपासून सिन्नर शहरातील शिवाजी चौकापर्यंत वृक्षदिंडी व शोभायात्रा काढण्यात येणार आहे.
सिन्नर बस स्थानक परिसरात शांतिगिरीजींच्या हस्ते प्रतीकात्मक वृक्षारोपण करण्यात येईल अशी माहिती जय बाबाजी भक्त परिवाराचे अध्यक्ष केशव जाधव, शरद कातकाडे यांनी दिली.
तालुकास्तरावर वृक्ष वाटप....
जय बाबाजी परिवाराच्यावतीने 'एका तासात पाच लाख वृक्ष लागवड' अभियान यशस्वी करण्यासाठी प्रत्येक तालुक्यात नियोजन समितीच्या माध्यमातून वृक्ष वाटप केले जाणार आहे. यासाठी गावनिहाय, वार्डनिहाय घरोघर लागवडीसाठी उपलब्धीनुसार रोपांचे वाटप करण्यात येणार आहे.
प्रत्येक कुटुंबाने घरातील मुला मुलींच्या हातून फळझाड अथवा फुल झाडांच्या किमान दोन रोपांची लागवड करायची आहे. वृक्षारोपण अभियानात सहभागी होण्यासाठी 9851511008 या व्हाट्सअप क्रमांकावर जय बाबाजी असा मराठी संदेश पाठवून नोंदणी करायची आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.