Nashik News : चांदवड शहरात 11 हजार दिव्यांनी साकारले ‘ जय श्रीराम’! 251 जोडप्यांच्या हस्ते सपत्नीक पूजा

श्रीराम जन्मभूमी प्राणप्रतिष्ठा सोहळा अयोध्या येथे पार पडत असताना चांदवड शहरात देखील विविध धार्मिक कार्यक्रमांनी श्री रामांना अभिवादन करण्यात आले.
A photograph taken by a drone named 'Jai Shri Ram', which was realized through the use of eleven thousand lights from the concept of Municipal President Bhushan Kasliwal, in the premises of Neminath Jain Secondary School in Chandwad.
A photograph taken by a drone named 'Jai Shri Ram', which was realized through the use of eleven thousand lights from the concept of Municipal President Bhushan Kasliwal, in the premises of Neminath Jain Secondary School in Chandwad.esakal
Updated on

गणूर : श्रीराम जन्मभूमी प्राणप्रतिष्ठा सोहळा अयोध्या येथे पार पडत असताना चांदवड शहरात देखील विविध धार्मिक कार्यक्रमांनी श्री रामांना अभिवादन करण्यात आले. यात मुख्य आकर्षण ठरले ते अकरा हजार दिव्यांनी साकारलेले जय श्रीराम नाव.

चांदवड शहराचे प्रथम नगराध्यक्ष भूषण कासलीवाल व रिंकू कासलीवाल यांच्या संकल्पनेतून श्री नेमीनाथ जैन माध्यमिक शाळेच्या प्रांगणात साकारण्यात आलेल्या या प्रतिकृतीला पाहण्यासाठी शेकडो रामभक्तांनी गर्दी केली.

श्री. भूषण व रिंकू कासलीवाल यांच्यासह २५१ जोड्यांना श्रीराम पूजेचा सपत्नीक मान देण्यात आला. कार्यक्रमास आमदार डॉ. राहुल आहेर, डॉ. आत्माराम कुंभार्डे, भाजप तालुकाध्यक्ष मनोज शिंदे, अर्चना कासलीवाल, डॉ. नितीन गांगुर्डे, सचिन निकम आदींनी प्रमुख उपस्थिती लावली. (Jai Shri Ram created by 11 thousand diyas in Chandwad city 251 worship by couples Nashik News)

A photograph taken by a drone named 'Jai Shri Ram', which was realized through the use of eleven thousand lights from the concept of Municipal President Bhushan Kasliwal, in the premises of Neminath Jain Secondary School in Chandwad.
Nashik News: तांदूळ, हळदीच्या वापरातून साकारली श्रीरामाची प्रतिकृती! हर्षदा खुटेंचे अनोखे अभिवादन!

या प्रतिकृतीभोवती आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती. सायंकाळी आतषबाजी सुरू असताना जय श्रीराम नाव साकारण्यासाठी वापरण्यात आलेल्या पणत्या प्रज्वलित करण्यात आल्या.

एकीकडे रामनामाचा गजर दुसरीकडे दीपमान पणत्या, श्री राम प्रतिमा पूजन, फुलांची आरास सगळे वातावरण भक्तिमय झाले. संपूर्ण दिवे प्रज्वलित झाल्यानंतर नागरिकांनी शाळेच्या बाल्कनीत जाऊन ही आकर्षक प्रतिकृती डोळ्यात साठवली.

चांदवड शहरात पहिल्यांदाच एवढा भव्यदिव्य प्रयोग झाल्याने अनेकांनी कौतुक केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी श्री नेमीनाथ जैन वसतिगृह विद्यार्थी, विद्यार्थिनी, शंभर स्वयंसेवक, जयेंद्र गवळी, तुकाराम साबळे, रामेश्वर पवार, गौरव सूर्यवंशी, मोहन पवार, समाधान झाल्टे, राजेश चव्हाण, बापू गांगुर्डे, महेश देशमुख,दीपक जाधव, विवेक महाले आदी प्रयत्नशील होते.

A photograph taken by a drone named 'Jai Shri Ram', which was realized through the use of eleven thousand lights from the concept of Municipal President Bhushan Kasliwal, in the premises of Neminath Jain Secondary School in Chandwad.
Ayodhya Prabhu Ram यांची मूर्ती कोरण्यात आलेली कृष्ण शिळा म्हणजे नेमकं काय?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.