रेडगाव खुर्द (जि. नाशिक) : ‘जितना बडा संघर्ष होगा, उतनी ही शानदार जीत होगी’ या उक्तीनुसार चांदवड तालुक्यातील वाकी खुर्दचे भूमिपुत्र जयदीप जाधव यांनी भारतीय सैन्यदलातील अतिशय कठीण व खडतर असे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करून ‘पॅरा कमांडो’ होण्याचा बहुमान पटकावला. त्याच्या या यशाचे सर्वत्र कौतूक होत आहे. (Jaideep Jadhav son of construction labor at Waki Khurd won honor of becoming para commando in indian army nashik news)
जयदीप जाधव यांची २०२१ मध्ये भारतीय सैन्य दलाच्या मराठा बटालियनमध्ये निवड झाली होती. त्यानंतर त्यांनी बेळगाव येथे नऊ महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण करून त्यांची सिक्कीम येथे पोस्टिंग झाली होती.
दरम्यानच्या काळातच भारतातून ३० उत्तम फौजदारांमध्ये त्यांना पॅरा कमांडोच्या प्रशिक्षणासाठी निवडण्यात आले. तेव्हापासून गेली चार महिने बेळगाव व आग्रा येथे अतिशय खडतर व अवघड समजल्या जाणाऱ्या पॅरा कमांडोचे प्रशिक्षण त्यांनी घेतले. प्रत्येक टेस्ट व परीक्षा पार करत सदरचे संपूर्ण प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले. त्यामुळे ३० फौजदारांपैकी अंतिम १२ फौजदारांमध्ये पॅरा कमांडो म्हणून त्यांची निवड झाली.
त्यांच्या निवडीमुळे वाकी खुर्द, लासलगाव व जिल्ह्यातून कौतुक होत आहे. जयदीप यांचे वडील गंगाधर जाधव गवंडी काम करतात. तर आई कावेरी जाधव अंगणवाडीत मदतनीस आहे. बंधू ऋषिकेश इंडियन आर्मीत सेना पोलिस (CMP) या पदावर कार्यरत आहेत. चुलते युवराज व शिवनाथ जाधव हे देखील भारतीय सैन्य दलात हवालदार पदावर कार्यरत आहेत. सामाजिक कार्यकर्ते किशोर जाधव यांचे ते पुतणे असून, पोपटराव जाधव यांचे ते नातू आहेत. यशाबद्दल वाकी खुर्द येथील विठ्ठल- रुक्मिणी मंदिरात सत्कार करण्यात आला.
या वेळी माजी पंचायत समिती सभापती शिवा सुरासे, विक्रम जगताप, अरुण देवढे, पोलिसपाटील दिगंबर कदम, पिंपळगाव नजीकचे उपसरपंच संजय महाले, भावराव देवढे, दिगंबर जाधव, शंकर गोरडे, हवालदार युवराज जाधव, विशाल जाधव, मुख्याध्यापक गणेश आवटी, डॉ. ईश्वर वाकचौरे, मंगेश देवढे, सचिन जगताप, उद्धव देवडे, सूर्यकांत देवढे, दत्ता निकम, समाधान निकम, श्याम देवढे, मनीष अहिरे, अवधूत देवढे, विनोद देवढे, समाधान जाधव, शरद जाधव, भगीरथ जगताप, आकाश जाधव, सम्राट जाधव आदी उपस्थित होते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.