गावठी दारू अड्डयावर जायखेडा पोलिसांचा छापा; 46 हजारांचा मुद्देमाल जप्त

local liquor factory seized reference
local liquor factory seized referenceesakal
Updated on

नामपूर (जि. नाशिक) : नामपूर परिसरात बिनदिक्कतपणे सुरू असलेल्या गावठी दारूच्या अड्डयावर जायखेडा पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारावर अचानक धाडसत्र सुरू केल्याने हातभट्टी चालकांचे धाबे दणाणले आहेत. जायखेडा पोलिसांनी सुराणे (ता. बागलाण) येथील आदिवासी वस्तीजवळ शुक्रवारी (ता. २) दारूच्या अड्डयावर छापा टाकून ४६ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. (Jaikheda police raid on Gavthi liquor den 46000 worth items seized Nashik Latest Marathi News)

local liquor factory seized reference
Nashik : नागरिकांच्या विरोधानंतर रस्त्यात सिमेंटचे गट्टू बसविण्यास सुरवात

अनेक दिवसांपासून मोसमखोऱ्यासह नामपूर परिसरातील गावांमध्ये हातभट्ट्यांचा व्यवसाय सुरू केला आहे. याबाबत जायखेड्याचे पोलिस उपनिरीक्षक तुषार भदाणे यांना गुप्त माहितीच्या आधारावर सुगावा लागताच सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार सोनवणे, ढवळे, गोटमवाड, सूर्यवंशी, बाबरी यांनी सुराणेला दुपारी अडीचच्या सुमारास छापा टाकला.

यात नदीकाठावर हातभट्टी सुरू असल्याचे निदर्शनास येताच उपनिरीक्षक भदाणे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घेराव घालून त्यांच्या ताब्यातील गावठी हातभट्टीची दारू तयार करण्यासाठी लागणारे ४२ हजार रुपये किमतीचे कच्चे रसायन, भट्टीवरील दोन हजार रुपयांचे रसायन, दोन हजार रुपयांची तयार दारू असा एकूण ४६ हजार १०० रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी नामदेव मोरे, मीरा पवार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईचे नागरिकांकडून स्वागत केले जात आहे.

"गावठी दारूच्या सेवनाने शेकडो लोकांचा राज्यात बळी गेला आहे. मोसम नदीकाठाजवळ हातभट्टी सुरू असल्याची गुप्त माहिती मिळताच कारवाई केली आहे. नागरिकांनी माहिती मिळाल्यास तातडीने पोलिसांना कळवावे. आगामी काळात परिसरातील हातभट्ट्यांवर अशीच कारवाई करण्यात येईल." - श्रीकृष्ण पारधी, सहाय्यक पोलिस निरीक्षक

local liquor factory seized reference
सातपूर परिसरात दोघींचे मंगळसूत्र ओरबाडले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.