Jal Jeevan Mission : ढिगभर तक्रारी, तरीही अभियंत्यांना प्रशासनाचे अभय?

लोकप्रतिनिधीही नाराज तरीही कारवाईस होतेय टाळाटाळ
Jal Jeevan Mission News
Jal Jeevan Mission Newsesakal
Updated on

Jal Jeevan Mission : जिल्ह्यातील जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या कामावरून लोकप्रतिनिधींकडून रणकंदन सुरू असून यात, ग्रामीण पाणी पुरवठ्याचे प्रभारी कार्यकारी अभियंता संदीप सोनवणे यांच्या कामकाजावर ताशेरे ओढण्यात आले.

त्यांचा पदभार काढून घ्यावा असे पत्र माजी मंत्री छगन भुजबळ यांनी दिले आहे तर, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी देखील त्यांचा पदभार त्वरित काढावा अशा सूचना केल्या. पालकमंत्री दादा भुसे यांनीही त्यांच्या कामावर नाराजी व्यक्त केली आहे.

असे असताना त्यांचा प्रभारी पदभार काढला जात नसल्याने अधिकारी वर्गात नाराजी आहे. त्यांना नेमके कुणाचे अभय आहे याची चर्चा रंगली आहे. (Jal Jeevan Mission increasing complaints yet engineers protected by administration nashik news)

जलजीवन मिशनच्या कामांवरून मंत्री डॉ. पवार, पालकमंत्री भुसे यांच्यासह माजी मंत्री भुजबळ, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आमदार हिरामण खोसकर यांनी जिल्हा परिषद प्रशासनाचे वाभाडे काढल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी तातडीने जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या कामांची पडताळणी करण्याचा निर्णय घेतला.

त्यानुसार ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे यांच्या नेतृत्वाखाली पथक नियुक्त करत त्यांना कामांची पाहणी करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पाहणी सुरू झाली आहे. वास्तविक या कामांची पाहणी करण्यासाठी कार्यकारी अभियंता सोनवणे यांना पाठविणे अपेक्षित होते.

परंतु, त्यांना यात दूर ठेवण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. जलजीवनची कामे तसेच ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कामकाजाचे वाभाडे काढल्यानंतर सोनवणे यांचा पदभार तत्काळ काढणे आणि नोटीस देणे प्रशासनाकडून अपेक्षित होते.

परंतु, त्यांच्यावर कोणताही कारवाई झालेली नाही. याउलट प्रशासनाकडून सोनवणे यांची पाठराखण केली जात असल्याने विभागप्रमुखांमध्ये नाराजी पसरली आहे. यापूर्वी प्रभारी असलेल्या कार्यकारी अभियंत्याची केवळ एक तक्रार प्राप्त झाल्यानंतर लागलीच त्यांचा पदभार काढून घेत त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Jal Jeevan Mission News
HSC Result 2023 : बारावीचा निकाल जाहीर; राज्‍यात पुणे अव्वल..! इथे पहा निकाल...

दुसरीकडे मात्र, सोनवणे यांच्यावर कारवाई करण्यास प्रशासनाकडून टाळाटाळ होत असल्याची चर्चा जिल्हा परिषदेत आहे.

शासन आदेश काय सांगतो

ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता पद रिक्त असल्याने त्याचा पदभार अन्य कार्यकारी अभियंता, उपअभियंता यांच्याकडे सोपवावा अशा सूचना शासनाने २८ आॅक्टोंबर २०२०२ ला काढलेल्या शासन आदेशात केल्या आहेत.

यात, कार्यकारी अभियंता पद रिक्त असल्यास त्यांचा पदभार हा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे द्यावा असा आदेश आहे. मात्र, तो आदेश धाब्यावर बसवत प्रशासनाने बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्याकडे हा पदभार सोपविला आहे.

Jal Jeevan Mission News
Gram Sevak Transfer: ग्रामसेवकांच्या केवळ विनंती बदल्या होणार! प्रशासकीय बदल्या नसल्याने नाराजीचा सूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.