देशात 50 अन् राज्यात 71 टक्के घरांमध्ये नळ कनेक्शन

Jal Jeevan Mission
Jal Jeevan Missionesakal
Updated on

नाशिक : प्रत्येक कुटुंबाला नळाद्वारे पाणी (Water) मिळावे या उद्देशाने केंद्र आणि राज्य सरकारतर्फे जलजीवन मिशनची (Jal jeevan Mission scheme) सुरवात करण्यात आली आहे. देशात आतापर्यंत ५०.२७ अन राज्यात ७१.१९ टक्के घरांमध्ये नळाचे कनेक्शन पोचले आहे. गोवा, तेलंगणा, अंदमान-निकोबार, पाँडेचरी, दादरा-नगर-हवेली आणि दीव-दमण, हरियानामध्ये शंभर टक्के घरांमध्ये नळाद्वारे पाणीपुरवठा सुरु झाला आहे. (jal jeevan mission Pipeline connection in state and country Nashik News)

देशातील कुटुंबांची संख्या १९ कोटी १५ लाख ६४ हजार २३५ इतकी असून त्यापैकी ९ कोटी ६३ लाख १ हजार ७७४ घरांना नळ कनेक्शन उपलब्ध झाले आहे. १५ ऑगस्ट २०१९ पर्यंत ३ कोटी २३ लाख ६२ हजार ८३८ घरांना नळ कनेक्शन मिळाले होते. जलजीवन मिशनला सुरवात झाल्यानंतर ६ कोटी ३९ लाख ३८ हजार ९३६ घरांना नळ कनेक्शन मिळाले आहे. शंभर टक्के नळ कनेक्शन मिळालेल्या घरांची संख्या राज्यनिहाय अशी : गोवा-२ लाख ६३ हजार १३, तेलंगणा-५३ लाख ८६ हजार ९६२, अंदमान-निकोबार-६२ हजार ३७, पाँडेचरी-१ लाख १४ हजार ९०८, दादरा-नगर-हवेली आणि दीव-दमण-८५ हजार १५६, हरियाना-३० लाख ९६ हजार ७९२.

Jal Jeevan Mission
आईला कामावरून कमी केल्याच्या रागातून व्यवस्थापकाचा खून; गुन्हा दाखल

उत्तरप्रदेशमध्ये १४ टक्के घरांना नळ कनेक्शन

महाराष्ट्रातील ७१.१९ टक्के म्हणजे, १ कोटी ४ लाख ५०० घरांना नळ कनेक्शन उपलब्ध झाले आहे. देशात सर्वात कमी म्हणजेच १३.८२ टक्के घरांपर्यंत उत्तर प्रदेशमध्ये नळ पोचले आहेत. २ कोटी ६४ लाख २७ हजार ७०५ पैकी ३६ लाख ५१ हजार ५९९ घरांना उत्तर प्रदेशात नळ कनेक्शन मिळाले आहे. पंजाबमध्ये ९९.७२, गुजरातमध्ये ९५.९१, हिमाचल प्रदेशमध्ये ९३.०५, तर बिहारमध्ये ९२.७४ टक्के घरांपर्यंत नळ दाखल झाले आहेत.

Jal Jeevan Mission
HSC Result : गवंडी काम करणारा विद्यार्थी जेंव्हा बारावी पास होतो...

नळाद्वारे पाणी पोचलेल्या घरांची टक्केवारी

सिक्कीम-७३.१२

कर्नाटक-५०.३४

मध्यप्रदेश-४१.११

पश्‍चिम बंगाल-२६.७१

राजस्थान-२४.७६

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.